
Rohit Pawar on Praful Patel and Sunil Tatkare: अजित पवार यांची अकाली एक्झिट राज्यातील प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलेली आहे. त्यातच हा विमान अपघात आहे की घातपात यावरून मोठा गदारोळ उठला आहे. आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या दोन पत्रकार परिषदेत या सर्व घटनाक्रमावर सविस्तर भाष्य केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया आणि वक्तव्य केली. त्यामुळे संशयाचा धूर अधिक गडद होत चालला आहे. अगदी थोड्यावेळापूर्वी रोहित पवार यांनी दिल्लीत माध्यांशी संवाद साधला. पुन्हा एकदा याविषयावर भूमिका मांडली आहे. त्यामुळे गजहब उडाला आहे.
विमान अपघातापूर्वीचा घटनाक्रम काय?
जर 27 जानेवारी 2026 रोजी अजितदादा पुण्याला कारने गेले असते तर पुण्याला पोहचले आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला गेले असते. तर मग ही दुर्दैवी घटना घडली नसती. 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यावर मी अगोदर बोललो आहे. बैठकीला उशीर झाला. त्यानंतर कुणाचा फोन आला हे लोकांना आता कळालं आहे. फाईलवर मुद्दामहून तिथल्या तिथं स्वाक्षरी झाली पाहिजे अशी एका नेत्याने इच्छा व्यक्त केली. दादांनी ती स्वाक्षरी केली आणि संध्याकाळी 7.13 वाजता, विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचं विमानाने जाण्याचा प्लॅन झाला असता तर 26 तारखेला संध्याकाळी अथवा 27 तारखेलाच दुपारी विमानाचं बुकिंग झालं असतं. जी काही क्रमवारी ती मी बोलून दाखवली. मी कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. माझं प्रामाणिक मत आहे की या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी. 27 तारेखापासून ते 28 तारखेपर्यंत चौकशी व्हायला पाहिजे. तर जे प्रमुख पायलट होते. ते कुणाला भेटले. महिनाभर आणि दोन महिन्याभर कुणाच्या संपर्कात होते, कुणाला भेटले होते याची सु्द्धा चौकशी व्हायला हवी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
प्रफुल्ल पटेल यांचा फोन, तटकरे हजर
प्रमोदराव हिंदूराव यांनी जी माहिती दिली, याचा अर्थ मी कुठंही खोटं बोललो नाही हे समोर येत आहे. जसं की 27 तारखेला तटकरे यांनी स्वतः सांगितले की तिथं स्वतः आलो, उशीरापर्यंत थांबलो. दुसर्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला असे हिंदूराव सांगत आहेत. आणि मग उशीरा झाला. याचा अर्थ दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे. एका पॉलिटिकल कन्स्लटन्शीबाबत तिथं चर्चा झाली.
बातमी अपडेट होत आहे…
Leave a Reply