
टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर फिनिशर रिंकु सिंह त्याच्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाला. रिंकूने सोशल मीडियावर त्याचे वडील खानचंद्र सिंह यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट लिहीली आहे. रिंकूने या पोस्टमध्ये वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रिंकूने या पोस्टमध्ये तुमची कायम आठवण येईल, असं म्हटलंय. खानचंद्र सिंह याचं 28 फेब्रुवारी रोजी गंभीर आजारामुळे निधन झालं होतं.
Leave a Reply