• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rinku Singh: क्रिकेटर रिंकु सिंह याला लाखोंचा गंडा? फेसबूक अकाऊंट हॅक; ईमेल आयडीच नाही तर बँकेचा तपशीलही बदलला, अपडेट काय?

February 6, 2026 by admin Leave a Comment

Cricketer Rinku Singh Facebook account hacked : क्रिकेट जगतातील उमदा खेळाडू रिंकु सिंह याला मोठा झटका बसला आहे. त्यांचे फेसबूक खाते हॅक झाले आहे. सायबर भामट्यांनी त्याचे खाते हॅक केले. अलिगड पोलिसांच्या सायबर शाखेने याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. तसेच तपास सुरू केला आहे. पोलिसांनुसार रिंकु सिंह याचे फेसबूक खाते दुसरीच कोणती तरी व्यक्ती विना परवानगी चालवत होते. रिंकु सिंह याच्या भावाने सायबर सेलला याविषयीची तक्रार केली. त्याआधारे एफआयआर नोंदविण्यात आला. हॅकर्सने रिंकु सिंह याचे
लॉगिन क्रेडेंशियल बदलले. त्याने रिंकु सिंह याच्या नावे अनेक पोस्ट केल्या. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. तर याप्रकरणात हॅकर्सने कुणाला गंडा घातला का, कुणाला पैसे मागितले का, काही व्यवहार झाला का, या सर्वच कोणातून तपास पूर्ण करण्यात येत आहे.

हॅकर्सने ईमेल ID आणि बँकेचा तपशील बदलला

वृत्तानुसार, हॅकर्सने रिंकु सिंह यालाच मोठा गंडा घालण्यात आल्याचे प्रथमदर्शनी अंदाज आहे. अर्थात याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिंकु सिंह याचे फेसबुकवर 1.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हे खातं मोनेटाईज्ड आहे. हॅकर्सने ई-मेल आयडी आणि रिंकु सिंहचा बँक खाते बदलले. काही दिवसांपूर्वी रिंकु सिंह याने त्याचे फेसबुक खाते तपासले. तेव्हा फेसबुक आयडी आणि पासवर्ड या आधारे तो लॉग इन करण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते शक्य झाले नाही. तर त्याच्या बँक खात्याचा तपशीलही वेगळंच काही सांगत होता. त्यामुळे मग रिंकु सिंह याला संशय आला. हॅकर्स त्याच्या फेसबूक खात्यातून मोठी कमाई चोरत असल्याचे समोर आले. रिंकु सिंह याने हा प्रकार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना कळवला. त्यानंतर त्यांचा भाऊ सोनू सिंह याने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यानुसार, रिंकु सिंह याचा फेसबुक ID हा त्याच्या पर्सनल ईमेल आयडीशी जोडलेला होता. पण हॅकर्सने त्याचा ईमेल आयडी हटवला आणि त्याजागी एक व्यावसायिक ईमेल आयडी जोडला. त्यामुळे कमाईची सर्व माहिती आणि कमाईची रक्कम ही इतर खात्यात जाऊ लागली.

अकाऊंट रिकव्हरी प्रक्रिया सुरू

या तक्रारीनंतर सायबर सेल सक्रिय झाला. पोलिस आता तो IP एड्रेस आणि ईमेल ID ट्रॅक करत आहे, ज्या आधारे रिंकु सिंह याच्या मुळ खात्यात मोठा बदल करण्यात आला. अकाऊंट रिकव्हरीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी फेसबुक, मेटाच्या अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. याप्रकारामुळे सर्वच सेलिब्रिटी आणि खेळाडूंना ही धक्का बसला आहे. सायबर भामट्याने मोठ्या चतुराईने ही प्रक्रिया केल्याने ती लक्षात आली नाही. आता रिंकु सिंह याला कितीचा गंडा घालण्यात आला. फसवणूक करण्यात आली हे काही समोर आले नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘त्या’ आयलँडवर रंगायचा सेक्सचा बाजार, माजी पंतप्रधानांपासून…., कसं आहे ते आयलँड?
  • अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातील या मुद्द्यामुळे मोठी खळबळ, उंची राखण्यात..
  • दुखापतग्रस्त खेळाडू नंबर 7! आतापर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सात खेळाडू आऊट, जाणून घ्या
  • T20 World Cup स्पर्धेत सामना न खेळताच पाकिस्तान बाहेर? बहिष्कारानंतर सलमान आगा टेन्शनमध्ये
  • प्रसिद्ध अभिनेत्याने तिहार तुरुंगात जाऊन केलं सरेंडर? चाहत्यांना धक्का, काय आहे प्रकरण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in