
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हे 2 संघ आमनेसामने आहेत. उभयसंघातील सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघात तोडीसतोड आणि विस्फोटक फलंदाज आहेत.हेन्रिक क्लासेन, अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड यासारखे राक्षसी फलंदाजी करणारे खेळाडू सनरायजर्स हैदराबादच्या गोटात आहेत. तर आरसीबीकडे विराट कोहली, फिलीप सॉल्ट, रजत पाटीदार, रोमरिया शेफर्ड आणि यासारखे फलंदाज आहेत. त्यामुळे चाहत्यांना पहिल्याच सामन्यात धावांचा महापूर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्याबाबत आपण प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Leave a Reply