• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB vs MI, WPL 2026 : मुंबईसाठी करो या मरो सामना, पलटण आरसीबीचा हिशोब करणार का?

January 25, 2026 by admin Leave a Comment

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात (WPL 2026) आतापर्यंत 5 संघांनी साखळी फेरीतील 8 पैकी प्रत्येकी 6-6 सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिले आणि सलग 5 सामने जिंकून प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. तर आता उर्वरित 2 जांगासाठी 4 संघांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. गतविजेता मुंबईला या मोसमात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईने 6 पैकी 4 सामने गमावले आहेत. तर फक्त 2 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला आहे.

या डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमातील 16 व्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्ससमोर आरसीबीचं आव्हान असणार आहे. आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर मुंबईसाठी प्लेऑफच्या समीकरणांनुसार हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे मुंबईला हा सामना जिंकणं भाग आहे. त्यामुळे पलटणचा या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे. उभयसंघातील सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

आरसीबी विरुद्ध मुंबई सामना कधी?

आरसीबी विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना हा सोमवारी 26 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

आरसीबी विरुद्ध मुंबई सामना कुठे?

आरसीबी विरुद्ध मुंबई सामना यांच्यातील सामन्याचा थरार हा बडोद्यातील कोतांबी इथे असलेल्या बीसीए स्टेडियममध्ये रंगणार आहे.

आरसीबी विरुद्ध मुंबई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आरसीबी विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

आरसीबी विरुद्ध मुंबई सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?

आरसीबी विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅचचा थरार अनुभवता येईल.

मुंबई पलटवार करणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वूमन्स या दोन्ही संघांची या चौथ्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मुंबई-आरसीबी दोन्ही संघ 9 जानेवारीला आमनेसामने आले होते. तेव्हा आरसीबीने स्मृती मंधानाच्या नेतृत्वात मुंबईवर 3 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स या पराभवाची परतफेड करत आरसीबीचा हिशोब चुकता करणार का?  याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबई कितव्या स्थानी?

दरम्यान 15 सामन्यांनंतर आरसीबी या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर मुंबई चौथ्या स्थानी आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रशियाची भारताला सर्वात मोठी ऑफर, घोषणा होताच अमेरिकेत भूकंप, ट्रम्प यांच्या स्वप्नांचा चुराडा?
  • एकनाथ शिंदे यांच्या सभेला शिवसेनेतील मोठ्या नेत्याची दांडी, नाराजीची चर्चा
  • Pankaja Munde: तो एक निर्णय आणि पंकजा मुंडेंविरोधात गावकरी आक्रमक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाण्यास मज्जाव, घडलं तरी काय? 
  • ऐश्वर्या रायने रक्त सांडलं… शाहरुख खान दारू प्यायला… माधुरी दीक्षितबद्दल तर नको त्या अफवा… कोणालाच माहिती नसलेलं मोठं रहस्य
  • सर्वात मोठा सेल….या फोनवर मिळतेय प्रचंड सूट, फीचर्स आणि बॅटरी पाहून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in