• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB vs CSK Live Streaming : चेन्नईसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान, आरसीबी सलग दुसऱ्या विजयासाठी तयार, कोण मिळवणार 2 गुण?

April 4, 2026 by admin Leave a Comment


चेन्नई सुपर किंग्स आयपीएल स्पर्धेतील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे.चेन्नईने मुंबई इंडियन्सनंतर 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. मात्र चेन्नई 19 व्या मोसमात (IPL 2026) दिग्गज अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनी याच्याशिवाय बेहाल असल्याचं चित्र आहे. चेन्नईला ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. तर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या पर्वात विजयी सुरुवात केली आहे. रविवारी 5 एप्रिलला आरसीबी विरुद्ध सीएसके यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईचा हा तिसरा तर आरसीबीचा दुसरा सामना असणार आहे. चेन्नईसमोर या सामन्यात पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे. तर आरसीबी सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात कोण विजेता ठरतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. आरसीबी-चेन्नई सामन्याची वेळ आणि इतर माहिती जाणून घेऊयात.

आरसीबी विरुद्ध सीएसके सामना कधी?

आरसीबी विरुद्ध सीएसके सामना रविवारी 5 एप्रिलला होणार आहे.

आरसीबी विरुद्ध सीएसके सामना कुठे?

आरसीबी विरुद्ध सीएसके सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

आरसीबी विरुद्ध सीएसके हेड टु हेड रेकॉर्ड्स

बंगळुरु विरुद्ध चेन्नई यांच्यात आतापर्यंत एकूण 35 वेळा आमनासामना झाला आहे. चेन्नईने 35 पैकी सर्वात जास्त सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. चेन्नईने बंगळुरुला 21 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने चेन्नईवर 13 वेळा मात केली आहे. तर उभयसंघातील एका सामन्याचा निकाल लागला नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in