• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rahul Gandhi: ‘मी काय बोलावं हे पण तुम्हीच सांगा’ राहुल गांधींचा लोकसभेत संताप, ओम बिर्लांचं तडक उत्तर काय?

February 3, 2026 by admin Leave a Comment


Rahul Gandhi Heated Conversation with Om Birla: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात शा‍ब्दिक चकमक उडाली. काँग्रसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोणत्याही पुराव्याशिवाय एक वक्तव्य वाचत होते. त्यावर संसदेच्या नियमांचा पाढा वाचत ओम बिर्ला यांनी त्यांना हटकले. बिर्ला यांनी या प्रकारावर तीव्र हरकत घेतली. राहुल गांधी यांचा ही संताप झाला. आता तुम्हीच सांगा मी काय बोलावं, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यावर पुन्हा बिर्ला यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावर मी तुमचा सल्लागार नाही. मात्र नियमानुसार हे सभागृह चालवण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचे बिर्ला यांनी सुनावले. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका, चीन या मुद्यावर आपल्याला मत व्यक्त करू दिले जात नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांचा मुद्दा काय?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बजेट सत्राच्या दुसर्‍या दिवशी सोमवारी सभागृहातील चर्चे दरम्यान भारतीय लष्करातील एका माजी अधिकाऱ्याची छापून आलेली प्रतिक्रिया वाचली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याप्रकारावर लागलीच हरकत घेतली. नियमानुसार दुजोरा नसलेली आणि कोणतीही अधिकृत नसलेली माहिती गांधी वाचत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी त्यासाठी नियमांचा आधार घेतला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना असे न करण्याचा इशारा दिला.

दोघांमध्ये शा‍ब्दिक चकमक

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे म्हणाले की, “सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही आरोप लावत आहात. पण तुम्ही नियमांचं पालन केले नाही. ही कृती काही योग्य नाही.” लोकसभेतील कामकाज हे नियमानुसार व्हावे ही त्यांची जबाबदारी आहे. सदस्यांना वारंवार या नियमांच्या पालन करण्याची आठवण करून देण्याची वेळ येऊ देऊ नका असे ताशेरे बिर्ला यांनी ओढले. त्यावर, “अध्यक्ष महाराज, आपण एक काम करा. तुम्हीच मला सांगा की मी काय बोलावं” असे राहुल गांधी म्हणाले.

VIDEO | Lok Sabha Speaker Om Birla (@ombirlakota) says, “As Leader of the Opposition, you are making allegations in the House and not following the rules. This is not appropriate.”

In response, Lok Sabha LoP Rahul Gandhi says, “You please tell me what I should speak, Speaker… pic.twitter.com/bRzYzLVh76

— Press Trust of India (@PTI_News) February 2, 2026

राहुल गांधी यांची ही तिरकस टिप्पणी बिर्ला यांना आवडली नाही. मी तुमचा सल्लागार नाही, पण अध्यक्ष म्हणून माझे हे कर्तव्य आहे की सभागृह हे नियमानुसार चालावे आणि यादीतील विषयावरच चर्चा व्हावी. त्याव्यतिरिक्त इतर विषयावर चर्चा होऊ नये अशी कडक भूमिका बिर्ला यांनी मांडली. आजही लोकसभेत गोंधळ दिसून आला. आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • India Tariffs : अमेरिकेने भारताचा केला मोठा गेम, टॅरिफ कमी केला पण…ट्रम्प यांच्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ!
  • Pankaja Munde | आई देव पाण्यात ठेवून बसली होती, हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रीया
  • 9 मिनिटांचं हे गाणं गायल्यानंतर गायकाच्या तोंडातून आलं होत रक्त, थिएटरमध्ये ऐकताच रडायचे लोक
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांनी दिल्लीला बोलावलं, राजधानीत घडामोडींना वेग
  • टेन्शनमुळे खरंच केस पांढरे होतात का? 99 टक्के लोकांना माहित नाही सत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in