• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rafale Deal : रशिया जास्त जवळचा असूनही भारत SU-57 ऐवजी फ्रान्सची राफेल फायटर विमानं का विकत घेतोय?

February 24, 2026 by admin Leave a Comment


सध्याच्या जमान्यात एअर पावर खूप महत्वाची आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी आपल्या हवाई शक्तीमुळेच आपण पाकिस्तानवर मात करु शकलो. कुठल्याही युद्धाची दिशा बदलण्यात एअरफोर्सची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे ज्या देशाकडे जितकी शक्तीशाली एअरफोर्स त्या देशाच्या विजयाची शक्यता तितकीच तसच त्या देशाच्या नादाला लागण्याची कोणी हिम्मत करत नाही. भारताला चीन आणि पाकिस्तान या देशांचा शेजार लाभला आहे. मागच्या 12 बारावर्षात या दोन्ही देशांसोबत अनेकदा संघर्षाच प्रसंग आले. खासकरुन पाकिस्तानसोबत युद्धाची वेळ आली होती. अशावेळी आपली एअरफोर्स भक्कम असणं गरजेच आहे.

चीनकडे आज पाचव्या आणि सहाव्या पिढीची फायटर जेट्स आहेत. पाकिस्तानकडे सुद्धा 4.5 जनरेशनची F-16, JF-17, J-10 ही विमानं आहेत. चीनचा त्यांच्याकडे स्टेल्थ फायटर जेट्स असल्याचा दावा आहे. ही विमानं रडारला दिसत नाही. म्हणजे सध्याच्या स्थितीत चीन आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. चीन आणि पाकिस्तानचा सामना करायचा असेल, तर आपलं हवाई दल तितकचं भक्कम, आधुनिक असणं गरजेच आहे. त्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत. लवकरच फ्रान्ससोबत 114 राफेल फायटर जेट खरेदीचा करार होईल. सध्या भारताकडे 36 राफेल फायटर जेट्स वापरात आहेत.

रशिया त्यात जास्त जवळचा

भारताचे रशिया, फ्रान्स आणि अमेरिका या देशांसोबत संरक्षण संबंध आहेत. अमेरिकेसोबतचे संरक्षण संबंध अलीकडच्या वर्षात वाढले आहेत. भारताने अमेरिकेकडून हेलिकॉप्टर्स आणि टेहळणी विमानं विकत घेतली आहेत. रशिया आणि फ्रान्ससोबत अनेक दशकापासून संरक्षण संबंध आहेत. रशियन बनावटीची मिग सीरीजची तसच सुखोई फायटर जेट्स भारतीय हवाई दलाच्या वापरात आहेत. फ्रान्सची राफेल, मिराज ही विमान इंडियन एअरफोर्स अनके वर्षांपासून वापरत आहेत. रशिया आणि फ्रान्स हे दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत. रशिया त्यात जास्त जवळचा आहे. कारण आपल्या कठिण काळात रशिया नेहमीच भारताच्या बाजूने उभा राहिला आहे.

आपण पाचव्या पिढीचं Su-57 सोडून राफेल का विकत घेतोय?

रशियाने आपल्याला Su-57 या फायटर विमानांची ऑफर दिली आहे. Su-57 हे पाचव्या पिढीचं फायटर विमान आहे. म्हणजे स्टेल्थ तंत्रज्ञानासह अनेक अत्याधुनिक सिस्टिम त्यात आहे. तेच फ्रान्सचं राफेल 4.5 जनरेशनचं विमान आहे. म्हणजे Su-57 पेक्षा थोडं मागे जाणारं. पण तरीही भारत फ्रान्सबरोबर 114 राफेल फायटर विमानांच्या खरेदीचा करार करणार असं बोललं जातय. असं का? आपण पाचव्या पिढीचं Su-57 सोडून राफेल का विकत घेतोय? यामागे काय कारणं आहेत. ते जाणून घ्या.

विमान देणारं पण टेक्नोलॉजी नाही

सर्वप्रथम आपण भारत आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या 114 राफेल फायटर जेट खरेदीचा करार समजून घेऊया. भारत फ्रान्सकडून फक्त राफेल विकत घेणार असं नाहीय, तर भारतातही राफेलचा कारखाना लावला जाईल. इथेही उत्पादन होईल. फ्रान्सच्या दसॉ एविएशन कंपनीने राफेलची निर्मिती केलीय. आता बातमी अशी आहे की, दसॉ भारताला विमान देणारं पण टेक्नोलॉजी नाही.

राफेलचे सोर्स कोड का महत्वाचे?

फ्रान्समधील एका बिझनेस मॅगजीननुसार, फ्रान्स सरकारने अधिकृतपणे म्हटलय की, ते विमानं देतील पण डेटा शेअर करणार नाही. म्हणजे राफेलचा सोर्स कोड मिळणार नाही. सोर्स कोड मिळाला नाही तर भारत मनासारखं या विमानांना अपग्रेड करु शकणार नाही. आपल्या पद्धतीची शस्त्र सुद्धा त्यात फिट करता येणार नाहीत. म्हणजे राफेल मध्ये महत्वाचे बदल करण्यासाठी भारताला संपूर्णपणे फ्रान्सवरच अवलंबून रहावं लागेल. भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा फायटर विमान खरेदीचा करार ठरणार आहे. राफेलचे सर्वात आवश्यक सॉफ्टवेयर सोर्स कोड दिले जाणार नाहीत. फ्रान्स स्पेक्ट्रा, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टिमचे सोर्स कोड गोपनीयच ठेवणार अशी माहिती आहे.

फ्रान्स हे सोर्स कोड का देत नाहीय?

भारत या विमानात स्वत:चे सेंसर, शस्त्र किंवा सॉफ्टवेयर फ्रान्सची मदत आणि मंजुरीशिवाय जोडू शकणार नाही. एक्सपर्ट्नसनुसार याआधी खरेदी केलेल्या 36 राफेल मध्येही सोर्स कोड मिळाले नव्हते. त्यामुळे भारताला अडचणी आल्या. फ्रान्सच्या मते सोर्स कोड ही त्यांनी अनेक वर्ष मेहनतीने बनवलेली प्रॉपर्टी आहे. त्यामुळे ते कुठल्याही देशासोबत सोर्स कोड शेअर करणार नाहीत.

राफेलपेक्षा Su-57 सरस विमान असूनही भारत ते का विकत घेत नाहीय?

या उलट रशिया भारताला Su-57 च्या लायसनसह टेक्नोलॉजी ट्रान्सफर करायला तयार आहे. भारताकडे सुखोई विमान निर्मितीचा अनुभव आहे. भारतात सुखोईचा प्लानंट आहे. Su-57 च्या निर्मितीसाठी त्यात काही बदल करावे लागतील. खर्चाच्या दृष्टीने थोडं परवडणारं सुद्धा आहे. रशियाची ऑफर आकर्षक वाटत असली तरी असं केल्याने भारताचा स्वत:चा AMCA प्रोग्रॅम मागे पडू शकतो. भारताने मागच्यावर्षीच AMCA प्रोजेक्टची घोषणा केली. या प्रोग्रॅम अंतर्गत भारताने पाचव्या पिढीचं फायटर जेट विकसित करण्यावर काम सुरु केलय. पाचव्या पिढीच्या फायटर जेट निर्मितीमध्ये भारत अमेरिका, चीन, फ्रान्स, स्वीडन या देशांच्या तुलनेत मागे आहे. आज अमेरिका, रशिया आणि चीन या देशांकडे स्वत:ची पाचव्या पिढीची फायटर विमानं आहेत. आपल्याला या शर्यतीत मागे पडून चालणार नाही. कारण आपल्या डोळ्यासमोर पाकिस्तान नाही, तर चीनला ठेवावं लागेल. चीनने तर सहाव्या पिढीची फायटर जेट्स विकसित केल्याचा दावा केलाय.

म्हणून भारताची राफेलला पसंती

रशियांच Su-57 ची ऑफर नाकारण्यामागचं हे सुद्ध एक कारण आहेच. त्याशिवाय भारताला फ्रान्सच्या सहाव्या पिढीची फायटर जेट निर्मिती प्रोजेक्टमध्ये पार्टनरशिप मिळू शकते. पाचव्या पिढीच्या फायटर जेटसाठी भारताची फ्रेंच कंपनी साफरान आणि युकेच्या रोल्स रॉईससोबत बोलणी सुरु आहे. हाय-थ्रस्ट (110-140 kN) इंजिन बनवण्यासाठी साफरान आणि डीआरडीओच्या GTRE यांनी भागिदारी केली आहे. भारताच्या पाचव्या पिढीच्या AMCA Mk2 आणि भविष्यातील नौदलाच्या फायटर जेटमध्ये या इंजिनचा वापर करण्यात येईल.पाचव्या पिढीचं विमान विकसित करताना फ्रान्सकडून मिळणारे हे लाभ लक्षात घेऊनच कदाचित भारताने रशियाच्या Su-57 ऐवजी फ्रान्सच्या राफेलला पसंती दिली असेल.

इंजिन एक महत्वाचा टप्पा

भारताने स्वदेशी तेजस फायटर विमान बनवलय. हे 4.5 जनरेशनच विमान आहे. पण या विमानासाठी लागणार इंजिन भारताला स्वबळावर विकसित करता आलेलं नाही. त्यामुळे आता अमेरिकेच्या कंपनीकडून तेजससाठी आपण इंजिन विकत घेत आहोत. भारताच्या स्वदेशी फायटर जेटच्या कार्यक्रमात इंजिन एक महत्वाचा टप्पा असेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण युद्ध थांबताच भारताचा मोठा खेळ, भारताचे 3 धुरंधर थेट विदेशात, निर्णय घेत..
  • मुंबईकरांच्या प्रवासात अडथळे, रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा, कधी, कोणत्या गाड्या रद्द?
  • मोठी बातमी! इराणकडून भारताला दणका, त्या एका निर्णयाने हाहाकार, आता भारताला..
  • विवोचा हा 9020mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख
  • Horoscope Today 10th April 2026 : आजचा दिवस दणदणीत जाणार… या राशींच्या लोकांसाठी मोठी खूशखबर; फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in