
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या ताज्या कलांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ५ पैकी ३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर उर्वरित २ जागांवर भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्याचा विचार करता, राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
अन्य ठिकाणी, सांगली जिल्ह्यातील खानापूरमध्ये शिंदेच्या सेनेच्या सई शिंदे आघाडीवर आहेत. धाराशिव जिल्ह्यात भाजपने खाते उघडले असून, कळंब तालुक्यातील इटकर गणातून रामचंद्र सांगळे विजयी झाले आहेत. महायुतीतही काही ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत.
पंचायत समितीच्या ३१ जागांचे कल हाती आले असून, त्यामध्ये भाजपने १० जागांवर आघाडी घेत आपला दबदबा निर्माण केला आहे. भाजपने यंदाच्या निवडणुकांमध्ये सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) केल्याचे दिसत आहे. प्रचारावर अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात सहभागी न होण्याचा घेतलेला निर्णय यामुळे काही प्रमाणात परिणाम झाल्याचे नमूद करण्यात आले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही ठिकाणी एकत्र निवडणुका लढवत आहेत, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होताना दिसत आहेत.
Leave a Reply