• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pune News | पुणे पुन्हा हादरलं! क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार

March 20, 2026 by admin Leave a Comment


पुणे जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धेच्या बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भैरवनाथ मैदान परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट स्पर्धेचा बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बैठकीदरम्यानच दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद वाढला आणि तो चिघळत जाऊन गोळीबारापर्यंत पोहोचला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in