• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pune-Mumbai Expressway: नव्या ‘मिसिंग लिंक’ मुळे कोंडी फुटणार का ? आणखी कोणते पर्याय ?

February 16, 2026 by admin Leave a Comment


यशवंतराव चव्हाण मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी पहाटे ट्रक उलटला आणि घाटातील ट्रॅफीक दोन्ही दिशेने जवळपास ३२ तास जाम झाले.त्यामुळे देशातील या पहिल्या एक्सेस कंट्रोल द्रुतगती महामार्गाचा फोल पणा उघड झाला आहे का ? असा सवाल केला जात आहे. या मार्गावर मिसिंग लिंकचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. ही मिसिंग लिंक एकदा का सुरु झाली तर प्रवाशांच्या वेळेत अर्धा तासांची बचत होईल असे म्हटले जात आहे. परंतू घाटात वाहनचालकांकडून शिस्तीत वाहने चालविली जात नाहीत. तसेच एखादा अपघात झाला तर मार्ग पटकण मोकळा करण्याची यंत्रणाही आपल्याकडे नसल्याचे या अपघातातून उघड झाले आहे.  या मार्गावर अपघात झाला तर त्याची झटपट माहिती डिस्प्ले किंवा मोबाईलवर दिली गेली तर अनेक प्रवासी अन्य पर्यायांचा विचार करुन योग्य निर्णय घेतील त्यामुळे निष्कारण कोंडी होणार नाही असे म्हटले जात आहे. काय आहे यावर उपाय हे जाणून घेऊयात…….

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सुरु होणार आहे. मात्र, त्याच आधी द्रुतगती मार्गावर अडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने खंडाळा घाटात ३२ तासांचे कधी नव्हे ते जीवघेणे ट्रॅफीक जाम झाल्याची घटना घडली. आता या मार्गावर १३.३ किमीची मिसिंग लिंकचा बायपास तयार करण्यात आला असून त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत ३० मिनिटांची बचत होणार असून प्रवास देखील सुरक्षित होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ( MSRDC ) हा प्रकल्प राबवित आहे.

गेल्या आठवड्यात मंगळवारी सायंकाळी बोरघाटात अडोशी टनेलच्या तोंडावरच ज्वलनशील propylene gas चा टँकर उलटल्याने ३२ तासांचा ट्रॅफीक जाम झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. हा मोठ्या अपघातामुळे मिसिंग लिंक प्रकल्प या वाहतूक कोंडीवर उत्तर शोधेल का ? असा सवाल केला जात आहे.

सध्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जवळपास १९ किलोमीटरच्या तीव्र वळणे आणि उतार तसेच बोगदे असलेला घाटाचा हा रस्ता मान्सून आणि अपघात झाल्यास दीर्घकाल चालणारे ट्रॅफीक जाम तसेच दरडी कोसळण्याच्या भीतीमुळे वाहनांसाठी स्पीड ब्रेकर ठरला आहे.

Missing link का आला चर्चेत

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकमध्ये दोन बोगदे (८.९ km आणि १.९ km), ९०० मीटरचा व्हायडक्ट आहे. आणि टायगर व्हॅलीत १८० मीटर उंचीवर एक ६५० मीटरचा केबल स्टेएड ब्रिज बांधण्यात आला आहे. या केबल स्टेएड ब्रिजसाठी टाकलेले पिलर हे तब्बल १८२ मीटर उंचीचे असून ते वांद्रे – वरळी सी लिंक साठी टाकलेल्या पिलरहून जास्त उंत आहेत.

हा मिसिंक लिंक प्रकल्प अफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बांधत असून त्याचा खर्च ६,६९५ कोटी रुपये आहे. या प्रकल्प खरे तर डिसेंबर २०२५ मध्ये सुरु होणार होता, परंतू घाटातील अतिवृष्टी, जोरदार वारे आणि सुरक्षेच्या दृष्टीकोणातून तसेच करोना काळ यामुळे हा प्रकल्प प्रचंड रखडला आहे.

३२ तासांची कोंडी !

मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.४५ वाजता अडोशी बोगद्याच्या ५० मीटर समोरच मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवरच ज्वलनशील गॅसचा टँकर उलटला गॅस गळतीच्या भीतीमुळे सुरक्षेसाठी दोन्ही दिशेची वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे १५ किलोमीटरच्या पट्ट्यात गाड्या अडकून पडल्या.त्यानंतर जवळपासून ५० किलोमीटरचा ट्रॅफीक जाम झाल्याने हजारो प्रवाशांना रात्रभर अन्न पाण्या वाचून रस्त्यात अडकून पडावे लागले.

ज्यावेळी दुसरा टँकर आणून या टँकरमधील गॅस त्या टँकरमध्य भरण्यात आला आणि अपघातग्रस्त टँकर हायड्रॉलिक क्रेनद्वारे उचलण्यात आला त्यानंतर या मार्गावरील ट्रॅफीक थेट गुरुवारी मध्य रात्री १ वाजता सुरु होऊ शकते.या टँकरमधील तिन्ही व्हॉल्वचे बॉल दबले गेल्याने द्रव रुपातील प्रोपीलीन गॅसची गळती होत होती. त्यामुळे ५०० मीटरपर्यंतही जर एखादी ठिणगी उडाली असती तर मोठा ब्लास्ट झाला असता असे म्हटले जाते.

त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक हा गॅस टँकर रिकामा करावा लागल्याचे म्हटले जात आहे. एकच सुरक्षित राहिलेल्या व्हॉल्वद्वारे अनेक लहान टँकरमध्ये हा गॅस काळजीपूर्वक भरला गेला.चार क्रेनच्या मदतीने हा अपघात ग्रस्त टँकर हलवण्यात आला. गुरुवारी पहाटे ५ वाजता हा टँकर खालापूर टेस्टींग सेंटरला नेण्यात आला. एनडीआरएफ, पोलिस, अग्निशमन दल आणि इतर राज्याच्या यंत्रणा आणि लोकल एजन्सी ३२ तास या ऑपरेशनमध्ये गुंतल्या होत्या.

मात्र यामुळे या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या ट्रॅफीकमध्ये हजारो जणांना उपाशी तपाशी अडकून राहावे लागले. राज्य परिवहन महामंडळ आणि खाजगी ट्रॅव्हलच्या १५० हून अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

काय आहेत मिसिंग लिंकची वैशिष्ट्ये ?

प्रकल्पाचा खर्च ६६९५ कोटी रुपये
अंतर कमी होणार खोपोली एक्झीट ते कुसगांव मुळ अंतर ६ किमीने कमी होणार
वेळेची बचत अपघात प्रवण क्षेत्र आणि तीव्र चढ उतार टळल्याने ३० मिनिटांची बचत होणार
आठ पदरीकरण अस्तित्वातील ३ मोठे पुल, १ लहान पुल आणि अडंरपाससहीत ५.८६ किमी ६ पदरी रस्त्यांचे ८ पदरीकरण
२ मोठे समांतर पुल पुल क्र. १ – (Viaduct -I) – ९०० मीटर लांब आणि ६० मीटर उंच
पुल क्रं. २- ( Cable Stayed Bridge ) ६५० मीटर लांब आणि १८४ मीटर उंच
२ समांतर बोगदे बोगदा क्र. १ – १.६४ किमी लांब आणि २३.५० मीटर रुंद ****
बोगदा क्र. २ – ८.९२ किमी. लांब आणि २३.५० मीटर रुंद



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in