• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PSL 2026 : पाकिस्तानात खेळायला येणाऱ्या खेळाडूंना मिळाली धमकी, बांगलादेशने उचललं असं पाऊल

March 23, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान आणि दहशतवाद हे नातं आता काही लपून राहिलेलं नाही. पाकिस्तानाने कायम दहशतवादाला खतपाणी घातलं आहे. त्याचीच फळं आता त्यांना भोगावी लागत आहेत. एकीकडे, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून विदेशी एका पाठोपाठ एक माघार घेत आहे. दुसरीकडे, इराण इस्राईल युद्धामुळे पाकिस्तानात इंधनाच्या कमतरतेमुळे आणखी संकट ओढावलं आहे. त्यामुळे पीसीबीने क्रिकेट सामने प्रेक्षकाविना होतील असा निर्णय घेतला आहे. असं असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर आणखी एक संकट उभं राहिलं आहे. या स्पर्धेपूर्वी दहशतवादी संघटनांनी विदेशी खेळाडूंना धमकी दिली आहे. विदेशी खेळाडूंनी पाकिस्तान येऊ नये, नाही तर जे काही होईल त्यासाठी ते जबाबदार नसतील. जमात उल अहरार या दहशतवादी संघटनेने ही धमकी दिली आहे.

जमात उल अहरार या दहशतवादी संघटनेने जाहीरपणे सांगितलं आहे की, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि डेरिल मिचेल यांनी खेळू नये असं सांगितलं आहे. जमात उल अहरारने धमकीत इशारा दिला की, “आम्ही जगभरातील सर्व क्रिकेट बोर्डांना सल्ला देतो की त्यांनी आपले खेळाडू पाकिस्तानला पाठवू नयेत. येथे त्यांना काही झाल्यास, ते जबाबदार राहणार नाहीत. आम्ही आधीच इशारा दिला आहे. जर खेळाडूंनी माघार घेतली नाही, तर आम्ही आमच्या शक्तीनुसार सर्वकाही करू, पण सामना होऊ देणार नाही. खेळाडूंना मैदानात उतरण्यापासून रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”

🔴 JUST IN 🇵🇰
Armed opposition groups in Pakistan have issued a statement urging all foreign players participating in the Pakistan Super League (PSL) cricket matches to avoid traveling to Pakistan, stating that their security is not guaranteed and there is a risk of harm.
The… pic.twitter.com/caf7Tim1ep

— Islamabad Post (@ISBPost) March 23, 2026

पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेकडून धमकी मिळूनही बांग्लादेश आपल्या भूमिकेवर ठाम आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना पाकिस्तान जाण्याची परवानगी दिली आहे. बांगलादेशचे सर्व खेळाडू स्पर्धेत भाग घेतील, असं बांगलादेशच्या प्लेयर मॅनेजरने सांगितलं आहे. इतकंच काय तर बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नाहिद राणा यानेही पाकिस्तानात जाण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं. पीएसएलमध्ये मुस्तफिझुर रहमान, शोरिफुल इस्लाम, नाहिद राणा, रिशाद हुसैन आणि तंजिद हसन तमीम हे बांग्लादेशी खेळाडू भाग घेणार आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
  • Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in