
गांधी कुटुंबात लौकरच सनई-चौघडे ऐकायला येणार आहेत, त्याचं कारणही खास आहे. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस,खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याचा लवकर विवाह होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, रेहान वाड्रा(Rehan Vadra) याचा नुकताच दिल्लीस्थित अविवा बेगशी (Aviva साखरपुडा झाला असून वाड्रा आणि बेग या दोन्ही कुटुंबाच्या आशिर्वादाने रेहान व अविवा लौकरच लग्नबंधनात अडकतील. त्यामुळे प्रियांका गांधी या आता सासूबाई बनणार आहेत. त्यांच्या कुटुंबात सध्या आनंदाच वातावरण आहे. मात्र रेहान व अविवा यांचा विवाह नेमका कधी, कुठे होणार ते अद्याप समोर आलेलं नाही. लग्नाची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही.
प्रियांका गांधी यांना किती मुलं ?
प्रियांका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांना दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचं नाव रेहान वाड्रा आहे, तर मुलीचे नाव मिराया वाड्रा आहे. मिराया आणि रेहान यांच्या वयात फक्त दोन वर्षांचं अंतर आहे. मिराया ही रेहना याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.अविवाशी रेहानचा साखरपुडा झाला असून तो 25 वर्षांचा आहे. तर मिराया ही सध्या 23 वर्आषंची आहे. प्रियांका गांधी यांची दोन्ही मुलं मीडिया, लाइमलाइटपासून मात्र खूप दूर राहतात.
प्रियांका गांधी व रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान आणि लाडकी लेक मिराय, या दोघांनीही डेहराडूनच्या वेल्हम स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलं. त्यांची दोन्ही मुलं, राजकारण,प्रसिद्धी यांच्यापासून दूर असतात. 29 ऑगस्ट 2000 रोजी जन्मलेल्या रेहान याला कला आणि छायाचित्रणाची आवड आहे. तसंच त्याला शूटिंगही आवडतं. तर त्याची धाकटी बहीण, मिराया वाड्रा हिचं सध्या शिक्षण सुरू असून ती यूकेमध्ये ग्रॅज्युएशन करत आहेत. काँग्रेस नेते व प्रियांका गांधी यांचे भाऊ, राहुल गांधी हे मिरायाला भेटण्यासाठी नुकतेच लंडनलाही गेले होते. मिराया ही बास्केटबॉल प्लेअर देखील आहे. रेहान आणि मिराया हे त्याचं वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवतात. राजकीय कार्यक्रमांमध्ये ते फार क्वचित दिसतात.
Priyanka Gandhi : प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
भारत जोडो यात्रेत झाले होते सहभागी
रेहान वाड्रा आणि मिराया वाड्रा हे काही काळापूर्वी त्यांचा मामा, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले होते. एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत 2024 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हजेरी लावली होती. आणि जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र ते वगळता ते पब्लिक लाइफमध्ये फार दिसत नाही.
अविवा बेग काय करते ?
प्रियाका गांधी यांची होणारी सून, म्हणजेच रेहानची भावी पत्नी अविवा ही देखील दिल्लीची असून बेग कुटुंबीय हे वाड्रा कुटुंबाच्या नजीकचे मानले जातात. दिल्लीतील प्रतिष्ठित मॉडर्न स्कूलमधून अविवाने सुरूवातीचे पूर्ण केले आणि नंतर ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून मीडिया कम्युनिकेशन आणि पत्रकारितेमध्ये तिने डिग्री घेतली. कौटुंबिक ओळखीवर ती अवलंबून नाही, तिची स्वतःची एक वेगळी ओळखही आहे. अविवा एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि प्रोड्यूसर देखील आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पोर्टल्स आणि प्रकाशनांमध्ये तिच्या अनेक फोटोंना जागा मिळाली आहे. ती राष्ट्रीय स्तरावरची फूटबॉलपटू देखील आहे.रेहान आणि अवीवा बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. ते 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते अशी माहिती समोर आली आहे. रेहान अनेकदा त्याची आई प्रियंका गांधींसोबत राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये दिसतो, तर अवीवा तिच्या स्वतःच्या सर्जनशील क्षेत्रात ॲक्टिव्ह असते.
Leave a Reply