• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…

April 9, 2026 by admin Leave a Comment


Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज कायम त्यांच्या भक्तांना योग्य सल्ला देत चांगली वाट दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक सेलिब्रिटी देखील त्यांनी भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतात. एवढंच नाही तर, सत्संगादरम्यान महाराज भक्तांच्या प्रश्नांची उत्तरं देखील देतात. प्रेमानंद महाराज यांनी भोंदूबाबा कसा असतो आणि त्याला ओळखायचं कसं… याबद्दल स्पष्टच सांगितलं आहे… गेल्या काही दिवसांपासून, भोंदूबाबांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जे बाबा असल्याचं नाटक करत अनेकांची फसवणूक करतात.

अशात एका सत्संगादरम्यान प्रेमानंद महाराज यांना एका भक्ताने प्रश्न विचारला की, संत म्हणजे कोण? कोणाला खरे संत मानावे? संताला त्याच्या बाह्य रूपावरून ओळखलं पाहिजे का? कोणत्याही भोंदूबाबाला त्याचे केस आणि कपड्यांवरून कसं ओळखता येईल… हो सोप्या शब्दात सांगितलं आहे..

प्रेमानंद महाराज म्हणतात, ‘खरा संत आणि महात्मा तोच आहे, ज्याने तीन गोष्टींवर विजय मिळवला आहे… पहिली गोष्ट म्हणजे कामवासनेवर विजय, संपत्तीवर विजय आणि किर्तीवर विजय…’ एवढंच नाही तर, सन्यास कसा घेता येतो, यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण केलं. ‘गुरुशिवाय संन्यास घेता येत नाही..केवळ मुखवटे घालतात, त्यांना संन्यास प्राप्त होत नाही… असं ते म्हणाले…’

एवढंच नाही तर, खऱ्या संताची ओळख त्याचे केस आणि कपड्यांवरून देखील पटते.. महाराज सांगतात की,  ‘तुम्ही कपड्यांवरून आणि केसांवरून खरा संत कोण आहे ते ओळखू शकता…’ प्रेमानंद महाराजांच्या मते, खऱ्या संतांना ओळखण्याच्या आणखी शैली आहेत. तुम्ही खऱ्या संतांना त्यांच्या केसांवरून आणि कपड्यांवरून सहज ओळखू शकता.

प्रेमानंद महाराजांच्या मते, “खऱ्या साधू-संतांना एकतर पूर्ण केस असतात किंवा त्यांनी संपूर्ण डोक्याचं मुंडनं केलेलं असतं. प्रेमानंद महाराजांच्या मते, “खरा साधू सैल वस्त्र परिधान करतो. शिवाय, तो गुरु परंपरेनुसार वस्त्रे धारण करतो.” अशा प्रकारे तुम्ही देखील कपडे आणि केसांवरून खऱ्या आणि खोट्या संतांची ओळख पटवू शकता…



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
  • Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in