• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Praful Patel: दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनि‍करण? प्रफुल पटेल यांचा मोठा बॉम्ब, राष्ट्रीय अध्यक्षाविषयी मोठे वक्तव्य काय?

February 3, 2026 by admin Leave a Comment


Praful Pate on NCP Merger: अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाची चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये याविषयी अनुकूलता असली तरी बडे नेते कानावर हात ठेवून आहेत.विशेषतः अजितादादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा दावा करत आहेत.गोंदियात पत्रकार परिषद घेत अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी त्यांच्यावरील अनेक आरोपांना उत्तर दिले. इतरांनी आमच्या पक्षाच्या निर्णयात लुडबूड करू नये अशी समज त्यांनी दिली. त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाविषयी मोठे भाष्य केले.

आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय

यावेळी प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीची घडामोड सर्वांसमोर आणली.  आम्ही सुनेत्रा पवार वहिनींच्या घरी गेलो. त्यांचे दोन्ही सुपुत्र पार्थ आणि जयही होते. आम्ही सांत्वना देत राष्ट्रवादी पक्ष तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठी खंबीर उभा आहे. आमची आणि जनतेची भावना आहे की आपण ही जबाबदारी स्वीकारावी. त्यांनीही मोठेपणा दाखवला. त्या म्हणाले, दादांना कुठे थांबायचं आवडत नव्हतं. लाइफ मस्ट गो ऑन या स्पिरिटने काम करणारे ते होते, असं त्या म्हणाल्या, असं प्रफुल पटेल म्हणाले.

आम्हाला आणि महाराष्ट्राला दुख आहे. आम्ही त्यांना आग्रह केला. विचार करायला सांगितलं. तुम्ही विचार करून सांगा आपण पुढे जाऊ. आम्हाला समाधान आहे की त्यांनी सर्वांच्या विनंतीला मान दिला. तीन दिवसाचा शोक असतो. चौथ्या दिवशी त्या आल्या. त्यांची निवड केली आणि शपथ घेतली. आमच्या अंतर्गत प्रश्नावर वादळ आणि उलटसुलट चर्चा करण्यात आली. आम्ही आमच्या पक्षाचा नेता निवडणार की इतर पक्षाचा. आम्ही आमचा निवडणार असा संताप ही प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

त्यांना लाज वाटली पाहिजे

विधीमंडळ आणि राजकीय पक्ष असे दोन पार्ट आहे. विधीमंडळ हा पार्ट झाला आहे. केंद्रीय मंत्र्याला चुकून काही तरी माहिती दिली. त्यांना कुणी तरी चुकीची माहिती दिली असेल. पवार आणि अजितदादांसोबत मी काम केलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावरच राहिल. मी कार्यकारी अध्यक्ष आहे. विधीमंडळ आणि पक्षाचा विषय मार्गी लावण्याची जबाबदारी माझ्यावर आणि राज्यात तटकरेंवर आहे. राष्ट्रवादीत कोणत्याही व्यक्तीने इंडिकेशनही दिले नाही. सर्वांच्या भावना समजतात तसा आम्ही सुनीता ताईंची निवड केली. पक्षाचा निर्णय हा प्रक्रियेनेच होणार आहे. कोणी तेलंगणनाचा वार आहे. कोणी अमूक कसं बनलं पाहिजे, असं सांगत आहे. काही लोकांनी कधी निवडणूक लढवली नाही,. कधी लोकांनी एक मतही त्यांना दिलं नाही. ते लोक आम्हाला सल्ला दिला आहे. माझे वडील राज्यातून निवडून येत होते.मलाही निवडून दिलंय. आमच्या कुटुंबाबत आणि माझ्या बाबत कोणी बोलत असेल तर त्याला लाज वाटली पाहिजे, असे उत्तर पटेल यांनी दिले.

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सुरू असल्याबाबत प्रफुल पटेल यांना प्रश्न विचारला असता असा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नसल्याचे ते म्हणाले. तर अगोदर आमच्या पक्षातील विषय मार्गी लागू द्या असे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाचा विषय आता थंड बस्त्यात पडल्याचे समोर येत आहे.

पक्षाच्या अध्यक्षाचा निवड योग्यच आहे. योग्य प्रक्रियेने होईल. योग्य नेता निवडला जाईल. माझ्याशिवाय अध्यक्ष निवडला जाणार आहे. माझ्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला अध्यक्षपद मिळेल. मी अध्यक्षपदी राहणार नाही. राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून मीच काम करणार आहे असेही प्रफुल पटेल यांनी ठणकावले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Parth Pawar : राष्ट्रवादीकडून सर्वात मोठा निर्णय? पार्थ पवार यांची दिल्लीत…पडद्याआड मोठ्या घडामोडी!
  • Praful Patel | सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का? प्रफुल्ल पटेल यांनी त्या टीकेला दिले उत्तर; म्हणाले…
  • ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून गौरव मोरे हिंदीतल्या कॉमेडी शोमध्ये का गेला? सांगितलं खरं कारण
  • India-Pakistan Disupte : भारतासोबत मध्यस्थी घडवून आणण्याच्या प्रश्नावर रशियाची भूमिका जाहीर, पाकिस्तानसाठी धक्कादायक बाब
  • Rahul Gandhi: ‘मी काय बोलावं हे पण तुम्हीच सांगा’ राहुल गांधींचा लोकसभेत संताप, ओम बिर्लांचं तडक उत्तर काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in