• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM Kisan Yojana: 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा संपली! शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल दोन हजार, चेक करा स्टेट्स

February 15, 2026 by admin Leave a Comment


PM Kisan Yojana 22nd installment : केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेतंर्गत वर्षभरात तीन हप्त्यामध्ये 6,000 रुपये देण्यात येतात. चार महिन्यानंतर ही रक्कम जमा करण्यात येते. आता शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आतापर्यंत या योजनेत 21 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 22 वा हप्त्याची प्रतिक्षा आहे. मागील हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा झाला होता. 22 व्या हप्त्याची आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. पण ही प्रतिक्षाही लवकरच संपणार आहे. यादिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल

22 वा हप्ता कधी मिळणार?

या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2019 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे उद्धघाटन केले होते. ही योजना जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम ठरली आहे. म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणारी ही सर्वात मोठी योजना आहे.

काही वृत्तानुसार, PM किसान योजनेची पुढील हप्ता 22 वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2026 रोजी वितरीत होण्याची शक्यता आहे. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा आतापर्यंत करण्यात आलेली नाही. पण या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल अशी चर्चा करण्यात येत आहे. हा हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ईकेवायसी,

या शेतकऱ्यांना नाही मिळणार हप्ता

ज्या शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ज्यांनी भू-सत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अथवा अर्धवट ठेवली आहे. बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला आहे. बँकेचा IFSC कोड चुकीचा टाकला आहे.शेतकर्‍याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे आधार क्रमांक चुकीचा टाकला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांचा हप्ता जमा होणार नाही. हा सर्व चुका दुरुस्त केल्याशिवाय त्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता जमा होणार नाही.

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आणि इतर राज्यातील शेतकर्‍यांना विना Farmer ID शिवाय PM Kisan योजनेसाठी शेतकरी पात्र नसतील. या राज्यात फार्मर आयडी तयार करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. यासह इतर केंद्रावर फार्मर आयडी काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही, त्या शेतकऱ्यांना सु्द्धा अडचण येऊ शकते.

असे चेक करा स्टेट्स

शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या अधिकृत साईटवर गेल्यावर होमपेजवर Know Your Status हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर सर्व माहिती भरा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स तपासा.

या शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार?

यापूर्वी शेतकऱ्यांना 21 वा हप्ता मिळालेला नाही. जर त्यांनी ईकेवायसी आणि इतर अडथळे दूर केले असतील तर त्यांच्या खात्यात मागील हप्त्यासह 22 वा हप्ता असे मिळून चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था
  • मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in