• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM Kisan Yojana: शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, पीएम किसान योजनेचे दोन हजार या दिवशी खात्यात, सरकारची मोठी घोषणा

March 10, 2026 by admin Leave a Comment


PM Kisan 22nd Installment: पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याची (PM Kisan 22nd Installment) प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हा हप्ता जमा होणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता 13 मार्च रोजी जमा होऊ शकतो. केंद्र सरकारने पण याविषयीची अधिकृत तारीख घोषीत केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पीएम किसानच्या अधिकृत खात्यावरून सरकारने अंतिम तारखेची घोषणा केली आहे. पीएम किसानच्या अधिकृत खात्यावरून याविषयीची एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यानुसार, तीन दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे.

13 मार्च रोजी पीएम किसानचा हप्ता

पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता (PM Kisan 22nd Installment) कधी जमा होणार याची शेतकऱ्यांमध्ये प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. समाज माध्यमावर केलेल्या पोस्टनुसार शेतकरी सन्माननिधी योजनेचा हप्ता येत्या 13 मार्च रोजी जमा होईल. याविषयीची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यापूर्वी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर या तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तरच हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

पीएम किसानचा या शेतकऱ्यांना लाभ नाही

शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर भरणारे शेतकरी या योजनेच्या परीघाबाहेर आहेत. पीएम किसान योजनेतंर्गत काही नियम बदलण्यात आले आहे. त्यानुसार एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच योजनेचा लाभ मिळेल. इतर सदस्यांचा पत्ता कट होईल. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली आली आहे.

अगोदर या गोष्टीची पूर्तता करा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता पात्र शेतकर्‍यांना मिळणार आहे. ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना योजनेची रक्कम मिळणार नाही. योजनेचा हप्ता खात्यात जमा होईल की नाही हे शेतकऱ्यांना घरबसल्या तपासता येईल. लाभार्थ्यांच्या यादीत नाव आहे की नाही हे तपासता येईल. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जाऊन लाभार्थ्यांच्या यादी तपासता येईल. त्यासाठी आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवावा लागेल. “Get Data” वर क्लिक केल्यावर पेमेंट स्टेट्स चेक करता येईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in