• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Piyush Goyal: डंके की चोट पर… शेतकर्‍यांना काडीचाही नाही फटका, पीयूष गोयल यांचा भारत-अमेरिका व्यापार करारावर मोठा डंका

February 7, 2026 by admin Leave a Comment


Piyush Goyal on US-India Trade Deal: भारत आणि अमेरिकेतील व्यापारी करारामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्र धोक्यात आल्याचा दावा विरोधक दोन दिवसांपासून करत होते. देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी जोपर्यंत या कराराची प्रत समोर येऊन स्पष्टता येत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांशी संबंधित चिंता व्यक्त केली होती. आता देशाचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत या चिंता निरर्थक असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते हा करार दबावाखाली झालेला नाही. या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे आणि कृषी क्षेत्राचं कोणतंही नुकसान होणार नाही. या कराराविषयी त्यांनी संक्षिप्तपणे काही ठळक मुद्दे समोर आणले आहेत.

भारत आणि अमेरिकेत रखडलेला व्यापारी करार अखेर पूर्णत्वास गेला. 13 फेब्रुवारी, 2025 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय व्यापारी करारवर पहिल्यांदा औपचारिक बोलणी झाली होती. पण रशियाकडून इंधन खरेदीच्या मुद्दावर संबंध ताणल्या गेले आणि राजकीय वाद पेटला. काल परवा डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवल्याचे जाहीर केले. तसेच नियमीत टॅरिफमधील 7 टक्क्यांची कपात केल्याचे जाहीर केले. आता भारतावर 18 टक्के टॅरिफ लावण्यात आले आहे.

बातमी अपडेट होत आहे…

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in