• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Petrol-Diesel Price: उत्पादन शुल्कात कपात, पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? आजची किंमत काय? झटपट चेक करा

March 28, 2026 by admin Leave a Comment


Petrol-Diesel Price Today : मध्य-पूर्वेतील तणावाला तात्पुरता ब्रेक लागला असला तरी कच्चा तेल्याच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली आहे. जागतिक बाजारातील महागाईची झळ देशातंर्गत ग्राहकांना बसू नये यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात केली. त्यामुळे संभाव्य पेट्रोल-डिझेल दरवाढ टळली. सर्वसामान्यांसाठी पेट्रोल पंपावर किंमती स्थिर आहेत. तर इंधन निर्यातीवर केंद्र सरकारने पुन्हा विंडफॉल टॅक्स लागू केला आहे. कपातीनंतर पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 13 रुपयांहून थेट 3 रुपयांवर आले तर डिझेलवरील उत्पादन शुल्क शून्य झाले आहे. या धोरणामुळे सरकारचा वार्षिक 1.70 लाखांचा महसूल बुडणार आहे. पेट्रोल पंपावर स्वस्ताई आली नसली तरी महागाईची संभाव्य झळ बसणार नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यात सरकारला यश आले आहे.

पेट्रोल-डिझेलसाठी झुंबड, नांदेड जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश

नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी, शस्त्रबंदीचे आदेश लागू करण्यात आला. पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलच्या खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी 6 वाजेपासून ते 11 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश देण्यात आले. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 अंतर्गत अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आदेश काढला. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मात्र पोलीस,शासकीय कर्मचारी, तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि परवानगी घेतलेल्या धार्मिक मिरवणुकींना सूट देण्यात आली आहे. सभा, मोर्चे, मिरवणुका आणि ध्वनीक्षेपकासाठी परवानगी देण्याचे अधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. पेट्रोल डिझेलचा अतिरिक्त साठा करू नये असे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी वाहनधारकांना आवाहन केले आहे.

तुमच्या शहरात आज काय आहेत पेट्रोल आणि डिझेलची किंमत

शहर                   पेट्रोल                       डिझेल (किंमतः प्रति लिटर रुपये)

अहिल्यानगर          १०४.५९                        ९१.१२

अकोला                 १०४.२२                        ९०.७८

अमरावती              १०५.४७                        ९१.२८

छत्रपती संभाजीनगर १०५.१८                       ९१.६८

भंडारा                       १०५.२१                       ९१.७४

बीड                          १०४.८३                       ९१.०१

बुलढाणा                   १०४.४६                        ९१.३६

गोंदिया                     १०५.६४                          ९२.१५

नागपूर                      १०४.०५                         ९०.६१

कोल्हापूर                   १०४.७३                        ९१.२७

मुंबई                         १०३.५४                         ९०.०३

(स्त्रोतः गुडरिटर्न्स , या किंमती स्थानिक पातळीनुसार बदलू शकतात)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in