• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PCMC Election Results 2026 LIVE : भाजपची सत्ता कायम राहणार का? पिंपरी चिंचवडकरांचा काैल नेमका कोणाला? जाणून घ्या

January 15, 2026 by admin Leave a Comment


राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या. शेवटी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया झाली तर आज 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांचा अनेकांना फटका बसताना दिसतोय. 017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21 मध्ये (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली होती. मात्र, यंदा पूर्णपणे समीकरणे बदलली आहेत.

राष्ट्रवादीच्या कदम निकिता, वाघेरे उषा, आसवाणी हिरानंद उर्फ डब्बू किमतराम, भाजपचे वाघेरे संदीप बाळकृष्ण 2017 च्या निवडणुकीत विजयी झाले होते. मिलिंदनगर, संजय गांधीनगर, पिंपरी गाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीपर्यंत प्रभाग आहे. प्रभाग 21 वर भाजपाकडून दावा केला जात आहे.

प्रभाग क्रमाकं 22 काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, नढेनगर, पवनानगरपर्यंत आहे. यंदाच्या निवडणुकीत जोरदार लढत प्रभाग 22 मध्ये बघायला मिळाली. सर्वच पक्षांकडून या प्रभागावर दावा केला जातोय. प्रभाग क्रमांक 22 मध्ये एकूण 37738 मतदारांची संख्या आहे. 2017 च्या निवडणुकीत विजयी विनोद नढे, नीता पाडाळे, उषा काळे, संतोष कोकणे हे विजयी झाले होते. यंदा मात्र विजय कोणासाठीही सोप्पा नाही.

2017 मध्ये प्रभाग क्रमांक 23 मध्ये चार वॉर्डांचा समावेश होता. या वॉर्डाच वाहतूक नगरी, भक्ती शक्ती परिसर, सेक्टर नंबर 24, केंद्रीय वसाहत या परिसराचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील एकूण लोकसंख्या 36 हजार 947 एवढी आहे. तर या प्रभागातील अनुसूचित जातींची संख्या 2,182 आणि अनुसूचित जमातींची संख्या 330 एवढी आहे. प्रभाग 23 मध्ये भाजपाचे वर्चस्व बघायला मिळाले.

प्रभाग 24 वर भगव्याचं वर्चस्व की कमळाचं वर्चस्व यावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत आदी भाग प्रभाग 24 मध्ये येतात. 24 मधील एकूण मतदार संख्या 38 हजार 779 एवढी आहे. प्रभाग 24 मध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये यंदा जोरदार लढत होती. मध्ये वाल्हेकर वाडी, गुरुद्वार, डी. वाय. पाटील कॉलेज, शिंदेवस्ती, उत्तर परिसरामध्ये रेल्वे लाईनपर्यंत प्रभाग आहे. भाजपाचे वर्चस्व सध्या प्रभाग 25 मध्ये बघायला मिळतंय.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in