• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या

April 10, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील 17 वा सामना पंजाब किंग्सचं होमग्राउंड मुल्लानपूर येथे होत आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. पंजाब किंग्सने या स्पर्धेत विजयी सुरूवात केली आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ या पर्वात एका विजयासह आणि दोन पराभवांसह खेळत आहे. पंजाब किंग्स 5 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबाद 2 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता पंजाब किंग्सचा संघ मजबूत आहे. पण भुतकाळातील आकडेवारी पाहिली तर सनरायझर्स हैदराबादचा संघ पुढे आहे. त्यामुळे हा सामना तूल्यबळ होणार यात काही शंका नाही. सनरायझर्स हैदराबादकडे फलंदाजांची चांगली फळी आहे. त्यामुळे सामना फिरवण्याची ताकद आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्स संघ गोलंदाजीत बऱ्यापैकी आहे. त्यामुळे या सामन्यात काहीही होऊ शकते.

पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हेड टू हेड

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ 24वेळा भिडले आहेत. यात सनरायझर्स हैदराबादने 14 सामने जिंकले आहेत. तर फक्त 7 सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं आहे. मागच्या पर्वात या दोन्ही संघात फक्त एक सामना झाला होता. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 8 गडी राखून जिंकला होता. तर 2024 मध्ये दोन्ही सामने सनरायझर्स हैदराबादने जिंकले होते. 2023 मध्येही सनरायझर्स हैदराबादचं पारडं जड होतं. पंजाब किंग्सने 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादला 5 विकेट राखून शेवटचं पराभूत केलं होतं. पण याच पर्वातील पहिला सामना सनरायझर्सने जिंकला होता.

पंजाब आणि हैदराबाद दोन संघांमधील 2025 मधील सामना चर्चेत राहिला. कारण या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वोच्च धावसंख्या नोंदवल्या गेल्या. पंजाब किंग्सने 6 गडी गमवून 245 धावा केल्या आणि विजयासाठी 246 धावांचं आव्हान ठेवलं. पण सनरायझर्स हैदराबादने 2 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. आयपीएल स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या असलेला सामना ठरला. आता मागची आकडेवारी पाहता हैदराबाद पुन्हा एकदा पंजाब किंग्सला पराभवाची धूळ चारणार का? की पंजाब किंग्स इतिहास बदलणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in