• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Parth Pawar : राष्ट्रवादीकडून सर्वात मोठा निर्णय? पार्थ पवार यांची दिल्लीत…पडद्याआड मोठ्या घडामोडी!

February 3, 2026 by admin Leave a Comment


Parth Pawar : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात घडामोडी वाढल्या आहेत. अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सुनेत्रा पावर यांच्यावर आता बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीदेखील सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळताच सुनेत्रा पवार यांनी कराड येथे जाऊन प्रीतीसंगम येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. आता लवकरच त्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली असली तरीही इतर काही प्रश्नांची उत्तर मात्र अजूनही मिळालेली नाहीत. असे असतानाच आता राष्ट्रवादी पक्षातून सर्वात मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजितदादांचे यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार पार्थ पवार हे लवकरच दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. ते राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची दाट शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. याआधी सूनेत्रा पवार राज्यसभेवर खासदार होत्या. त्या उपमुख्यमंत्री झाल्याने आता त्यांची राज्यसभेची खासदारकीची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांची खासदार म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रावादीची कोअर टीम आणि इतर नेत्यांचीही त्याला सहमती असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पार्थ पवारांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जातंय.

पार्थ पवार यांना मिळणार सहा वर्षांचा कार्यकाळ?

सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेतील खासदारकीचा दोन वर्षांचा कार्यकाळ अद्याप बाकी होता. त्यांनी 4 जुलै 2028 रोजी खासदारकीची मुदत संपणार होती. सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीचा कार्यकाळ अद्याप 2 वर्षांचा बाकी असला तरीही पार्थ पवार यांना मात्र सहा वर्षांचा कार्यकाळ असलेल्या जागेवरूनच राज्यसभेत खासदार म्हणून पाठवले जाण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांनी याआधी 2019 साली मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु त्यावेळी त्यांना अपयश आले होते. आता पार्थ पवार यांनी राज्यसभेसाठी तयार करत आहेत. त्यामुळे आता काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ajit Pawar Post | अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
  • Big Losers: अख्खा संघ 50 धावांच्या आत गारद, T20 विश्वचषकात सर्वात कमी धावा करणारे संघ कोणते?
  • आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली..; मराठमोळ्या अभिनेत्रीने फोडला टाहो
  • Explained : टॅरिफवर ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न कसा काय? या पाच कारणांमुळे अमेरिकेला घ्यावं लागलं नमतं
  • ग्रीन टी ब्लॅक कॉफीला म्हणा NO….! ‘या’ प्रकारे कॉफी प्यायल्यामुळे होईल झटपट वेट लॉस…..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in