• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Parliament Budget Session | चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ; राहुल गांधी–राजनाथ सिंह यांच्यात शाब्दिक चकमक

February 2, 2026 by admin Leave a Comment


लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाकडून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. चीन आणि भारताच्या सीमेवरील परिस्थितीचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, चीनने भारताच्या हद्दीत चार तंबू ठोकले असल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र हे पुस्तक केंद्र सरकारने प्रकाशित होऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत या आरोपांना विरोध केला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत राहुल गांधींच्या दाव्यांना खोटे ठरवले. राहुल गांधी मांडत असलेली माहिती चुकीची असून, अशी माहिती त्यांना कुठून मिळाली, असा सवाल राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला.

राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, देशाच्या सुरक्षेशी संबंधित बाबींवर चुकीची माहिती पसरवणे योग्य नाही. राहुल गांधी आणि राजनाथ सिंह यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. या घडामोडींमुळे लोकसभेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vijay Wadettiwar | मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून वाद; महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
  • इलेक्ट्रिक किटली मध्ये फक्त चहा आणि कॉफीच नाही तर ‘हे’ पदार्थ देखील काही मिनिटांमध्ये होतात तयार
  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in