
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. परीक्षेच्या काळातील ताणतणाव आणि अभ्यासाचं नियोजन यावर त्यांनी विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या आहेत. तसेच परीक्षेबाबतच्या काही खास गोष्टीही त्यांना सांगितल्या. तुम्ही वर्गातील सर्वात ढ मुलांशी मैत्री करा. ही टेक्निक तुम्हाला उपयोगी पडेल. त्या मुलाला सांगा आज मी तुला गणितं शिकवतो. त्याला शिकवण्यासाठी तुमच्या मेंदूला ताण द्या. त्यामुळे त्याला शिकवता शिकवता तुमचा विषय तोंडपाठ होईल. आणि त्याचा तुम्हाला थेट परीक्षेत फायदा होईल, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मोदींसाठी काही खाद्यपदार्थही आणले होते.
परीक्षे पे चर्चाचा हा दुसरा एपिसोड होता. मोदींनी सुरुवातीलाच हा कार्यक्रम वेगळा आणि खास असल्याचं स्पष्ट केलं. देशाच्या वेगवेगळ्या भागात परीक्षे पे चर्चा हा कार्यक्रम झाला पाहिजे, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळेच मी देशातील विविध भागात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, असं मोदी म्हणाले. त्यामुळेच मोदींनी यावेळी तामिळनाडूच्या कोयंबतूरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
स्टार्टटप सुरू करा…
मी अनेक वर्षापासून परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून 10 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आलोय. त्यांच्याकडून शिकण्यासाठी मी संवाद साधत असतो. मी जेव्हा त्यांना भेटतो, त्यावेळी ते स्टार्टअप्सबाबत विचारत असतात. आपल्याला भविष्यात काय करायचं हे आधी विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही स्टार्ट्सअप्स टेक्नॉलॉजीवर फोकस करू शकता. तुमचे मित्र वेगवेगळ्या फिल्डमध्ये एक्सपर्ट असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत स्टार्टअप्स सुरू करू शकता, असंही मोदी म्हणाले.
#WATCH | PM Narendra Modi shares traditional Chhattisgarh snacks Thethri and Khurmi with students during 2nd episode of the 9th edition of ‘Pariksha pe Charcha’.
Source: DD pic.twitter.com/Vud72qgLv8
— ANI (@ANI) February 9, 2026
मोदींसाठी टिफिन
यावेळी विद्यार्थ्यांनी घरून टिफिन आणला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हा खास टिफिन आणला होता. यावेळी एका विद्यार्थ्याने मोदींना चकली दिली. त्यावेळी चकली कशी बनते? असा सवाल मोदींनी केला. त्यावर बेसनाला गोल आकार देऊन तळून काढतात. चकली कुरकुरीत आणि तिखट असते, असं या विद्यार्थ्याने सांगितलं. दिवाळीत चकली अधिक बनवली जाते, असंही त्याने सांगितलं. तर दुसऱ्या विद्यार्थीनीने मोदींना छत्तीसगडी खुरमी दिली. गुळ, पीठ आणि सूजी पासून खुरमी बनवल्या जात असल्याचं तिने सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व पदार्थांचा अस्वाद घेतला. तसेच आपल्या हाताने इतर विद्यार्थ्यांनाही हे पदार्थ खाऊ घातले.
Leave a Reply