• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Paper Leak: पेपरफुटीचा उमरेड पॅटर्न? बारावीचा पेपर फोडला कुणी? ते खासगी कोचिंग रडारवर

March 6, 2026 by admin Leave a Comment


Umred Paper Leak Connection: नागपूर जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोर आता उमरेडपर्यंत पोहचले आहेत. याप्रकरणात एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. HSC बोर्डाच्या परीक्षेत गेल्या 18 फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्र विषयाची परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली होती. चौकशीत केवळ रसायनशास्त्रच नाही तर गणित आणि भौतिकशास्त्र या विषयाचे पेपरही फुटल्याचा दावा करण्यात येत होता. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला. पेपर फुटी प्रकरणाची दखल शिक्षण मंत्र्यांसह गृहमंत्र्यांनी घेतली. या घटनेने नागपूर संपूर्ण राज्यात चर्चेला आलं. आता तपास जस जसा समोर सरकत आहे, तसतसे नवनवीन खुलासे समोर येत आहे. आरोपींनी पेपर फुटीची मालिकाच राबवल्याचे समोर आले आहे.

नागपूर पेपरफुटीत आतापर्यंत काय काय घडलं?

येथील सेंट उर्सुला शाळेच्या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीकडून मोबाईल जप्त केल्यावर पेपर फुटीचा भांडाफोड झाला होता. एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये काही विद्यार्थी होते. त्यात एकाने ही प्रश्नपत्रिका पोस्ट केली होती. त्यात फरहान अख्तर नावाच्या शिक्षकाने प्रश्नपत्रिकेची उत्तरे दिली होती. प्रकरणात मुस्ता खान, जुनेद अहमद जावेद शेख, दिनेश शंकर कोटांगळे, मनिष सुदाम शंभरकर, प्रदीप जागंडे यांना अटक करण्यात आली आहे. या पेपरफुटीचा मास्टरमाईंड संदीप सरटकर असल्याचे म्हटले जात होते. पण अपडेटनंतर याप्रकरणात अजूनही काही बडे मासे असल्याचे समोर येत आहे.

उमरेड पेपरफुटीचे केंद्र

नागपूर जिल्ह्यातील उमरेड हे पेपरफुटीचे केंद्र असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. उमरेड येथील खासगी शिकवणी वर्गातून फुटलेल्या १२ वी बोर्डाच्या रसायनशास्त्र पेपरमध्ये आणि प्रत्यक्ष बोर्डाच्या पेपरमध्ये मोठे साधर्म्य आढळले. उमरेड येथील टार्गेट अकादमी ऑफ सायन्स या खासगी शिकवणीतून हा पेपर फुटल्याचे समोर येत आहे. संचालक अतुल चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने अतिरिक्त पैसे देऊन पेपर खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. अतुलकडे हा पेपर संबंधित विषयाच्या २० दिवसांपूर्वीच हाती आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे याचे कनेक्शन पेपर सेट करण्यांपर्यंत तर नाही ना? यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in