
Pankaja Munde at Latur: लातूर जिल्ह्यातल्या जानवळ येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गावकरी नाराज झालेले पाहायला मिळाले. जानवळ गावात मंत्री पंकजा मुंडे यांची वाट पाहत गावकरी मोठ्या संख्येने थांबले होते, पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करावे आणि नंतर प्रचार सभा घ्यावी असे गावकऱ्यांचा आग्रह होता. मात्र उशीर झाल्याने पंकजा मुंडे अगोदर सभेला गेल्या. नेमका हाच निर्णय त्यांना अडचणीत आणणारा ठरला. यामुळे गावकरी त्यांच्यावर नाराज झाले.
गावकऱ्यांनी केला मज्जाव
सभा झाल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहचल्या. मात्र त्यांना गावकऱ्यांनी आता पुष्पहार अर्पण करायचा नाही अशी भूमिका घेतली. जानवळ गावात प्रवेश केल्या बरोबर बाबासाहेबांचा पुतळा लागतो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करूनच प्रत्येक नेतेमंडळी मग कार्यक्रमाला जातात, आम्ही आग्रह करूनही तुम्ही ऐकले नाही असं गावकऱ्यांचे म्हणणे होते. पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांना विनंती केली मात्र गावकरी ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. अखेर पंकजा मुंडे यांनी दुरूनच बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात जोडले आणि त्या पुढच्या सभेला निघून गेल्या. त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या. माझ्या सभेची खूप मागणी आहे. शक्य असेल तिथे मी जाते. आणि हे माझं काम आहे. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. प्रचार जोरात सुरू आहे. सभा प्रचंड मोठ्या होत आहेत . जेवढ्या ठिकाणी जात आहे तेथे 90 ते 95 टक्के विजय आहे. महानगरपालिकेचे ही तसेच आहे, नगरपालिकेचे ही तसचं आहे असा दावा पंकजा मुंडे यांनी केला.
यश मिळणार आहे. नंबर एकचा पक्ष आहे. सुनेत्रा पवार या पालकमंत्री झालेल्या आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अजित दादा पालकमंत्री होते. महिला म्हणून माझं नेहमीच सहकार्य राहील. विकासाची गोष्ट महिलांच्या दृष्टीने करता येते. मी पशुसंवर्धन मंत्री आहे. राष्ट्रीय पशु प्रदर्शन होणार आहे. माझी इच्छा होती माझा वैजनाथाच्या नगरीत महादेवाच्या साक्षीने ते शिवरात्रीला होत आहे तीन दिवसाचं हे प्रदर्शन राहील. खूप चांगला अनुभव येणार आहे आजूबाजूच्या शेतकर्यांनी नक्की यायला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
हा काही सोहळा नाही की एवढी मोठी सभा होईल फार धूम धडाका होईल. हे प्रदर्शन शेतकर्यांसाठी आहे. त्यांनी यावं, जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी आहे. खूप चांगला अनुभव राहील तो आणि शिवरात्रीला बरेच लोक येतात दर्शनाला ते सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील मी आव्हान करीन मोठ्या संख्येने सगळ्यांनी या प्रदर्शनामध्ये यावे आणि पशुप्रदर्शनातून भरपूर काही ज्ञान घेऊन जावं, असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान मंत्री पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर मार्गे मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून त्या सध्या प्रचार दौऱ्यावर असून, काल लातूर येथून रात्री परळीत आगमन झाले होते. परळी येथील त्यांच्या यशस्वी निवासस्थानी त्यांचा मुक्काम होता.आज सकाळी त्या हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या.
Leave a Reply