• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pankaj Bhoyar | जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निकाल थोड्याच वेळात; कोण जिंकणार? महायुती की महाविकास आघाडी?

February 9, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी पार पडल्या असून आज दि.9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकांमध्ये नेमकी बाजी कोण मारणार? महायुती की महाविकास आघाडी? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी राज्यात पार पडलेल्या नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेचा कल स्पष्टपणे भाजप आणि महायुतीच्या दिशेने दिसून आला आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप व महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून, त्याचाच परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही दिसून येईल, असा ठाम विश्वास पंकज भोयर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्येही भाजप आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा दावा त्यांनी केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Zilla Parishad Election Result 2026 | सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची स्वबळावर लढत; निकालाकडे लक्ष
  • सेटवर जोरदार भांडण अन् तणाव..; दीपिकानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा ‘ॲनिमल’ फेम दिग्दर्शकाशी पंगा, थेट चित्रपटातून बाहेर
  • वॉर्मर मशीनमध्ये नवजात बाळाला ठेवलं अन् अचानक… रुग्णालयात मातम; त्या घटनेने अख्ख शहर हादरलं
  • सिंधुदुर्गात 8 जिल्हा परिषद गट, 17 पंचायत समिती गण बिनविरोध
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालाचा आज फैसला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in