
पालघरमध्ये एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. राजू सिकंदर शेख या तरुणाने हिंदू नावाचा बनाव करून एका 29 वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने बनावट हिंदू नावाने इन्स्टाग्रामवर खाते उघडून संबंधित तरुणीशी ओळख वाढवली. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिच्याशी लग्न केल्याचे सांगितले जाते. मात्र लग्नानंतर आरोपीने तिचे शारीरिक शोषण करत सुमारे अडीच लाख रुपये उकळल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पीडित तरुणीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवले. मंदिरात लग्न केल्याचा दावा केला, मात्र नंतर त्याचे आधीच लग्न झाले असल्याचे समोर आले. या प्रकारामुळे आपण फसवणुकीला बळी पडलो असल्याचे तिने नमूद केले. या घटनेनंतर पीडितेने संबंधिताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पालघर पोलिसांनी योग्य ती मदत केल्याचे पीडित महिलेने सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply