• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pakistan Oil Crisis : आपण तर ट्रम्पना नोबेल देत होतो, मग त्यांनी..भारताला मिळालेली सवलत पाकिस्तानला झोंबली, नुसता जळफळाट

March 10, 2026 by admin Leave a Comment


इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. खरंतर पाकिस्तानचा सौदी अरेबियासोबत करार आहे. त्यानुसार एकादेशावरील हल्ला हा दोन्ही देशावरील हल्ला मानला जातो. इराणकडून सौदी अरेबियावर हल्ले झाले आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानने सौदी अरेबियासाठी युद्धात उतरलं पाहिजे होतं. पण युद्धात उतरण्याआधीच पाकिस्तान झोपून गेलाय. तेलाअभावी त्यांची हालत खराब झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार नजम सेठी यांनी शहबाज सरकारला खडेबोल सुनावले आहेत. “हे तेच लोक आहेत, जे डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल देते होते. आता हेच लोकं भारताला जशी सवलत दिलीय, तशी सवलत मागायला ट्रम्प यांच्याकडे का जात नाहीत?” असा सवाल नजम सेठी यांनी विचारला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 30 दिवस रशियाकडून क्रू़ड ऑईल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेने काहीही दावे करो पण भारताने हे नेहमीच म्हटलय की, त्यांच्यासाठी 140 कोटी भारतीयांची ऊर्जा सुरक्षा महत्वाची आहे. इराण युद्धानंतर पाकिस्तानात तेल संकटाने गंभीर रुप धारण केलय. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारने अभूतपूर्व निर्णय घेतला. एकाचवेळी पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रतिलीटर 55 पाकिस्तानी रुपयाने वाढवल्या. पाकिस्तानात पेट्रोल पंपावर रांगा दिसत आहेत. यावेळी पाकिस्तानात सामान्य पेट्रोलची प्रति लीटर नवीन किंमत 321.17 रुपये आहे. हाय-स्पीड डिझेल 335.86 रुपये प्रति लीटरने विकलं जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची प्रति तेल पिंप किंमत 110 डॉलर आहे.

पण जनतेवर हा बॉम्ब फोडू नका

नजम सेठी यांनी एका टीव्ही चॅनलवर बोलताना आपला सर्व राग काढला. आपलं सरकार कुठल्या प्रकारची धोरणं बनवतं? असा सवाल त्यांनी केला. “जनतेमध्ये तुमच्याबद्दल प्रचंड राग आहे. हा राग बाहेर आला, तर तुम्हाला समजणारही नाही. कुठल्यातरी जेटमध्ये बसून तुम्हाला पळावं लागेल. मेहरबानी करा, पण जनतेवर हा बॉम्ब फोडू नका. तुम्हाला हा बॉम्ब फोडायचा असेल तर नोकरशाह, अधिकारी, ब्युरोक्रॅट्स यांच्यावर फोडा, त्यांच्या सुविधा कमी करा” अशी मागणी नजम सेठी यांनी केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle : आशाताईंची ती इच्छा होणार पूर्ण, राज्य सरकारचा तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय!
  • बापरे! या अभिनेत्रीने 10 कोटींमध्ये बांधलेलं घर 100 कोटींना विकलं, घराचे फोटो पाहून तुम्ही म्हणाल…
  • Asha bhosle | स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंचे अंत्यदर्शन
  • ओला इलेक्ट्रीकची नवीन ई-स्कूटर S1 X+ 5.2 kWh लाँच, रेंज आणि किंमत किती पाहा
  • श्वेता तिवारीला कोण म्हणेल 25 वर्षांच्या मुलीची आई, ग्लमरस लूक पाहून म्हणाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in