• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर

April 10, 2026 by admin Leave a Comment


दोन दिवसांपूर्वी इराण-अमेरिकेमध्ये सीजफायरची घोषणा झाली. सगळ्या जगाने सुटकेचा निश्वास सोडला. पण त्यानंतर ज्या घडामोडी घडतायत, इराणकडून जी स्टेटमेंट येत आहेत, त्यावरुन हा सीजफायर किती दिवस टिकेल? हाच सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे. आजपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा सुरु होणार आहेत. पाकिस्तान या युद्धामध्ये मध्यस्थाच्या भूमिकेत आहेत. पण ज्या पाकिस्तानला स्वत:चे प्रश्न सोडवता येत नाहीत, ते मध्यस्थी काय घडवून आणणार?. कारण या शांतता चर्चेला सुरुवात होण्याआधीच पाकिस्तानने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाकिस्ताननेच स्वत:च आग लावली आहे. पाकिस्तानने इस्रायलला कॅन्सर म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या या स्टेटमेंटनंतर इस्रायलने त्यांच्या मध्यस्थेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी इस्रायलला संपवण्याची भाषा केली आहे. पाकिस्तानी संसदेत बोलताना त्यांनी भारत आणि इस्रायल आपले शत्रू असल्याचं ते म्हणाले. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अशी वक्तव्य करुन पाकिस्तानची उरली सुरली पत घालवली आहे. त्याशिवाय मध्यस्थ म्हणून पाकिस्तानची विश्वासहर्ता सुद्धा धोक्यात आणली आहे. ख्वाजा आसिफ यांच्या या वक्तव्यावरुन इस्रायलमध्ये मोठा गदारोळ सुरु झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधामन बेंजामिन नेतन्याहू यांनी पाकिस्तानच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

ही भाषा आम्ही अजिबात स्वीकारणार नाही

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या वक्तव्याला थेट इस्रायलच्या अस्तित्वाशी जोडलं. हा इस्रायलच्या अस्तित्वावर थेट हल्ला असल्याचं ते म्हणाले. पाकिस्तान किती बेजबाबदार देश आहे, हेच यातून दिसून आलय. आम्हाला मिटवून टाकण्याची भाषा आम्ही अजिबात स्वीकारणार नाही. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांसह अनेक नेत्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

The Prime Minister’s Office:

Pakistan Defence Minister’s call for Israel’s annihilation is outrageous. This is not a statement that can be tolerated from any government, especially not from one that claims to be a neutral arbiter for peace.

— Prime Minister of Israel (@IsraeliPM) April 9, 2026

क्षेत्रीय तणावात भर घालणारं वक्तव्य

इराण-अमेरिकेत चर्चेला सुरुवात होण्याआधीच पाकिस्तानच्या अशा वक्तव्याने मध्यस्थ म्हणून त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. आम्हाला मिटवून टाकण्याचं पाकिस्तानी वक्तव्य आम्ही अजिबात सहन करणार नाही असं इस्रायलने म्हटलं आहे. नेतन्याहू यांनी मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलय. या मध्यस्थीमध्ये पाकिस्तान पूर्णपणे तटस्थ नाही असा इस्रायलच्या मनात संशय आहे. क्षेत्रीय तणावात भर घालणारं वक्तव्य म्हणून इस्रायल याकडे पाहतो. इराणला खुश करण्यासाठी पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी इतकं घाणेरडं वक्तव्य केलं, असं इस्रायलच म्हणणं आहे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?
  • भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in