• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pakistan Army : पाकिस्तानी मंत्र्याने काढली त्यांच्याच लष्कराची लायकी; सत्य समोर आल्याने मुनीरची झोप उडाली!

February 4, 2026 by admin Leave a Comment


Pakistan Army : बलुच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानला चांगलेच जेरीस आणले आहे. या संघटनेने ऑपरशन हेरोफ 2.0 अंतर्गत बलुचमधील अनेक महत्त्त्वाच्या सुरक्षा स्थळं, नागरिकांची घरे, पोलीस ठाण्यावर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 17 सुरक्षा सैनिक आणि 33 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर पाकिस्तानाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 177 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. असे असतानाच आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वासा आसिफ यांनी पाकिस्तानी लष्कराची हतबलता सांगितली आहे. पाकिस्तानी सैनिक किती कमजोर आहेत, त्यांच्याकडे शस्त्रांची किती कमतरता आहे, याची सगळी माहिती त्यांनी दिली आहे.

बलुच लिबरेशन आर्मीकडे अत्याधुनिक शस्त्रे

ख्वाजा आसिफ यांनी नुकतेच पाकिस्तानी संसदेत बलुचिस्तानमधील परिस्थिती, बलुच लिबरेशन आर्मीने केलेले दहशतवादी हल्ले आणि या हल्ल्यांत झालेले नुककान याची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानी लष्कराची नेमकी परिस्थिती काय आहे? याबाबतही सांगितले. बलुच लिबरेशन आर्मीकडे आधुनिक पिस्तुल आहेत. त्यांची किंमत ही 20 लाखांपर्यंत आहे. आपल्या लष्कराकडे अशी शस्त्रे नाहीत. या संघटनेच्या सदस्यांकडे 4 हजार ते 5 हजार डॉलर्स किंमत असणारे थर्मल वेपन साईट्स, लेझर सिस्टीम आहेत. या यंत्रांच्या मदतीने ते रात्रीदेखील अचुक निशाणा साधू शकतात, असे ख्वासा आसिफ यांनी सांगितले.

पाकिस्तानी सैनिक बलुचिस्तानमध्ये हतबल

बलुच लिबरेशन आर्मीची शक्ती सांगत असतानाच ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान लष्कर किती अक्षम आहे, याचीही माहिती दिली. बलुचिस्तानची भौगोलिक स्थिती ही पाकिस्तानी सैनिकांसाठी आव्हानात्मक आहे. एखाद्या मोठ्या शहराला सांभाळण्यापेक्षाही या भागावर देखरेख करणे कठीण आहे. पाकिस्तानी सैनिक सक्रिय आहेत. परंतु एवढ्या मोठ्या प्रदेशावर गस्त घालण्यास ते सक्षम नाहीत असेही आसिफ यांनी स्पष्ट केले आहे.

#BREAKING: Pakistani Defence Minister Khawaja Asif inside Pakistani National Assembly admits to failure of Pakistan Govt and Army to counter Baloch Rebels in Balochistan. Says, Baloch rebels are using rifles, night vision devices and other equipment that even Pakistani forces… pic.twitter.com/qk5AZK9DBy

— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 3, 2026

पाकिस्तानी लष्कराचा खरा चेहरा उघड

दरम्यान, आसिफ यांनी दिलेली माहिती म्हणजे पाकिस्तानी लष्कराची खरी परिस्थिती समोर आल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तान नेहमी आम्ही जशास तसे उत्तर देऊ असे सांगतो. परंतु आता ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या माहितीनंतर पाकिस्तानच्या दाव्यांवर शंका उपस्थित केली जात आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in