• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PAK vs SL Live Streaming : पाकिस्तानसाठी शेवटची संधी, श्रीलंकेला पराभूत करत सेमी फायनलचं तिकीट मिळवणार?

February 27, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडने शुक्रवारी 27 फेब्रुवारीला न्यूझीलंडला सुपर 8 फेरीतील सामन्यात पराभूत केलं. इंग्लंडने यासह सुपर 8 फेरीत सलग तिसरा विजय मिळवला. इंग्लंड या विजयासह ग्रुप 2 मधून टेबल टॉपर ठरली. तर न्यूझीलंड सुपर 8 मोहिमेचा शेवट विजयाने करुन उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यात अपयशी ठरली. न्यूझीलंडला हा सामना जिंकून सुरक्षितपणे सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी होती. मात्र इंग्लंडने सामना जिंकत न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ केली. तसेच इंग्लंडच्या विजयामुळे आता पाकिस्तानलाही उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे शनिवारी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पाकिस्तानची कसोटी

पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर श्रीलंकेविरुद्ध फक्त जिंकून चालणार नाही. त्याच कारण म्हणजे  न्यूझीलंडचा नेट रनरेट. न्यूझीलंडच्या खात्यात सुपर 8 मधील 3 सामन्यानंतर 3 गुण आहेत. तर पाकिस्तानच्या खात्यात 2 सामन्यानंतर 1 गुण आहे. त्यामुळे पाकिस्तान श्रीलंकेविरुद्ध विजयी झाल्यास त्यांचेही 3 गुण होतील. मात्र ताज्या आकडेवारीनुसार न्यूझीलंडचा नेट रनरेट हा 1.390 असा आहे. तर पाकिस्तानचा नेट रनरेट -0.461 असा आहे.

त्यामुळे पाकिस्तानला नेट रनरेटनुसार गणित जुळवायचं असेल त्यांना श्रीलंकेविरुद्ध 64 धावांनी सामना जिंकावा लागेल किंवा 13.3 ओव्हरमध्ये विजयी धावा पूर्ण कराव्या लागतील. पाकिस्तानने असं केल तरच त्यांना सेमी फायनलचं तिकीट मिळेल. अन्यथा पाकिस्तानचा फक्त जिंकूनही काहीही फायदा होणार नाही. न्यूझीलंडचा नेट रनरेट चांगला असल्याने त्यांना पाकिस्तानच्या विजयाचा काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला जर उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर नेट रनरेटसाठी जुळवाजुळव करावी लागेल.

त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा चांगलाच कस लागणार आहे. तर यजमान श्रीलंकेचा आपल्या मोहिमेतील सामना जिंकून स्पर्धेची सांगता विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. उभयसंघातील सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना कुठे?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सुपर 8 फेरीतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याचं आयोजन हे पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. उभयसंघातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्करील चॅनेल्सवर पाहाायला मिळेल. तर मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या? न्यायालयाकडून थेट ईव्हीएम तपासणीचे आदेश
  • Vastu Shastra : पितृदोषापासून मिळेल कायमची मुक्ती, करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in