• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PAK vs NED T20 WC Result: पाकिस्तानची धडपडत विजयी सुरुवात, नेदरलँडला 3 विकेटने नमवलं

February 7, 2026 by admin Leave a Comment


टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा 3 विकेट राखून पराभव केला. नेदरलँडने विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पाकिस्तानने शेवटच्या षटकात धडपडत 7 गडी गमवून पूर्ण केलं. पाकिस्तानकडून या धावांचा पाठलाग करताना साहिबजादा फरहान आणि सईम अयुब यांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या षटकापासून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पण तिसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. सईम अयुब 24 धावा करून तंबूत परतला. तर सलमान आगा 12 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. पाकिस्तानने पावरप्लेमध्ये 2 गडी गमवून 61 धावा केल्या.  पाकिस्तानची 98 धावांवर तिसरी विकेट पडली आणि सामन्याचं चित्रच बदललं. कारण दुसऱ्या चेंडूवर लगेचच उस्मान खानची विकेट मिळाली. त्यात बाबर आझमचा स्ट्राईक रेटने तर पाकिस्तानला पराभवाच्या दरीत ढकललं. संघाच्या 100 धावा असताना पाचवी विकेट पडली. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अडचणीत आला. मोहम्मद नवाज आणि शादाब खानची विकेट एका पाठोपाठ पडली. फहीमने शेवटी फटकेबाजी करून पाकिस्तानची लाज राखली आणि विजय मिळवून दिला. 

नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँडने फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्व गडी गमवून 147 धावा केल्या. तसेच विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं. नेदरलँडने त्यांच्या तुलनेत चांगली खेळी केली. सुरुवातील मॅक्स ओडाउडच्या रुपाने पहिला धक्का बसला. पण त्यानंतर डाव सावरला. मायकल लेविटने 24, बस दे लीडने 30, कोलिन एकरमॅनने 20, स्कॉट एडवर्ड्सने 37 धावा केल्या. पण तळाच्या फलंदाजांना फार काही करता आलं नाही. झॅक लायन कॅशे 9, लोगान व्हॅन बीक 0, आर्यन दत्त 13, रोएलॉफ व्हॅन डेर मेरवे 4, पॉल व्हॅन मीकेरेन 0 असे बाद झाले. काइल क्लेन हा नाबाद 2 धावांवर राहिला.

पाकिस्तानचा पुढचा सामना अमेरिकेशी 10 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे. कारण मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अमेरिकेने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे पराभवचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज असणार आहे. दुसरीकडे, अमेरिका देखील या स्पर्धेत मोठा उलटफेर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेचा संघ कागदावर जरी दुबळा वाटत असला तरी सामना फिरवण्याची ताकद आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in