• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PAK vs ENG : पाकिस्तान आणि इंग्लंड सामन्यात पाऊस पडणार का? तसं झालं तर काय? जाणून घ्या

February 23, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येत आहेत. खरं तर हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात पराभव झाला तर उपांत्य फेरीचा मार्ग बंद होणार आहे. इंग्लंड सध्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. कारण पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे काहीही करून पाकिस्तानला या सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. कारण पाकिस्तान न्यूझीलंड पहिला सामना पावसामुळे झाला नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण वाटून दिला होता. अशा स्थितीत दुसरा सामना गमवल्यास पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे या सामन्यात करो या मरोची लढाई आहे. पण प्रश्न असा आहे की या सामन्यातही पाऊस पडला तर काय? या सामन्यापूर्वी पावसाचा अंदाज काय सांगतो?

पावसामुळे सामना रद्द झाला तर…

पाकिस्तानचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आता दुसरा सामना रद्द झाला तर आणखी एक गुण मिळेल. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. कारण नेट रनरेट हा 0 असणार आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात नुसता विजय नाही तर नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडू नये अशीच प्रार्थना पाकिस्तान करेल. दुसरीकडे, हा सामना रद्द झाला तर इंग्लंडला फायदा होईल. तसेच उपांत्य फेरीत स्थान जवळपास निश्चित होईल. कारण तीन गुण होतील आणि नेट रनरेटही चांगली असेल.

पाकिस्तान इंग्लंड सामन्यात हवामान कसं असेल?

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 24 फेब्रुवारीला श्रीलंकेच्या पल्लेकेले मैदानात सामना होणार आहे. या दिवशी आकाश निरभ्र राहील. त्यामुळे पावसाची शक्यता कमी आहे. तसेच तापमान 34 अंश सेल्सियस राहण्याचाी शक्यता आहे. वादळी वाऱ्याची शक्यता सुद्ध 6 टक्के राहील. त्यामुळे या ठिकाणी आर्द्रता जास्त असेल. नाणेफेक झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल तेव्हा पावसाची शक्यता 5 टक्के राहील. त्यामुळे या व्यतिरिक्त कोणताही व्यत्यय येणार नाही. त्यामुळे हा सामना पूर्ण 20 षटकांचा होईल यात काही शंका नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in