
तुम्हाला या महिन्यात दोन नवीन स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर थोडे दिवस थांबा कारण ओप्पो कंपनी त्यांचे नवीन दोन 5जी स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करणार आहे. तर Oppo F33 Pro 5G हा फोन पुढील आठवड्यात कंपनीच्या एफ-सिरीजचा भाग म्हणून लाँच करणार आहे. त्यातच Oppo F33 5G हा फोन देखील लाँच केला जाईल. कंपनीने केवळ लाँचची तारीखच नाही, तर प्रो व्हर्जनचे डिझाइन, फीचर्स आणि रंगांचे पर्याय देखील जाहीर केले आहेत. हा फोन स्टारी ब्लू, मिस्टी फॉरेस्ट आणि पॅशन रेड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. चला तर मग ओप्पो कंपनीच्या एफ सिरीजच्या या दोन स्मार्टफोनची लाँच तारीख आणि किंमत जाणून घेऊयात.
Oppo F33 Series भारतात लाँच होण्याची तारीख
Oppo F33 Pro 5G आणि Oppo F33 5G हे दोन्ही स्मार्टफोन 15 एप्रिल रोजी भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच केले जातील. Gadgets 360 नुसार हे फोन 50-मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेऱ्यासह, 2-मेगापिक्सलच्या डेप्थ कॅमेरा सेन्सरसह लाँच केले जाणार आहे.
F33 Pro 5G मध्ये 100-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि GC50F6 सेन्सरसह 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा असू शकतो. हा फोन ड्युअल-व्ह्यू व्हिडिओ आणि कलरफुल फ्रंट फिल लाइटला देखील सपोर्ट करेल. तर Oppo K33 Pro 5G मध्ये फ्लॅशलाइट, नॅचरल लाइट, रिम लाइट आणि स्टुडिओ लाइट कॅमेरा इफेक्ट्ससह AI पोर्ट्रेट ग्लो देखील असेल.
डिझाइनच्या बाबतीत या फोनबद्दल बोलायचे झाल्यास ओप्पो F33 प्रो 5G मध्ये एक आयताकृती रियर कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यामध्ये रिंग एलईडी फ्लॅश आणि दोन कॅमेरा लेन्स असू शकतात. पॅनलच्या खाली मध्यभागी ओप्पो ब्रँडिंग दिसेल आणि फोनला फ्लॅट बॅक व फ्लॅट फ्रेम असेल.
कंपनीचा दावा आहे की या हँडसेटला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP69K रेटिंग मिळेल. पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कंट्रोल्स फोनच्या उजव्या बाजूला असतील.
F33 प्रो चा डिस्प्ले आकार, प्रोसेसर, mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट याबद्दल माहिती अद्याप सांगण्यात आलेलं नाहीये. त्यात याव्यतिरिक्त F33 बद्दलची माहितीही अद्याप समोर येणं बाकी आहे की या फोनमध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील.
Leave a Reply