• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Odi Series : वर्ल्ड कपनंतर बांगलादेश दौरा, वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, पहिला सामना कुठे?

March 4, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर यजमान आणि गतविजेत्या टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत 8 मार्चला न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. अंतिम सामन्यात टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा पोहचणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे. अशात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

निवड समितीने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. शेजारी पाकिस्तान क्रिकेट टीमचं टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतून आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तान श्रीलंकेविरुद्ध सुपर 8 फेरीत सेमी फायनलच्या हिशोबाने नेट रनरेटनुसार विजय मिळवण्यात अपयशी ठरली. त्यामुळे पाकिस्तान विजयानंतरही सेमी फायनलमध्ये पोहचण्यात अपयशी ठरली. आता पाकिस्तान वर्ल्ड कप मोहिमेनंतर बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

पाकिस्तानचा बांगलादेश दौरा 2026

पाकिस्तान बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान या दौऱ्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेटने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

शाहीन शाह अफ्रिदी कर्णधार, बाबरला डच्चू

बांगलादेश विरूद्धच्या या एकदिवसीय मालिकेत शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेतून अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम याला वगळण्यात आलं आहे. तर वेगवान गोलंदाज हारीस रौफ याचं कमबॅक झालं आहे. या मालिकेचा थरार 11 ते 15 मार्च दरम्यान रंगणार आहे. तसेच हे तिन्ही सामने एकाच मैदानात होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 11 मार्च, शेरे बांगला स्टेडियम, ढाका.

दुसरा सामना, 13 मार्च, शेरे बांगला स्टेडियम, ढाका.

तिसरा सामना, 15 मार्च, शेरे बांगला स्टेडियम, ढाका.

बांगलादेश विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी पाकिस्तान टीम : शाहीन शाह अफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अशरफ, फैसल अकरम, हारिस रऊफ, हुसैन तलत, माज सदाकत, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, मुहम्मद गाजी गोरी (विकेटकीपर), साद मसूद, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा आणि शमील हुसैन.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब
  • Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं
  • IPL होऊ दे, मग घेऊन जा रे भावा, वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचे पक्का प्रॉमिस; Viral Video पाहून हसू नाही आवरणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in