
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्या आयपीएलमधील केकेआर टीमकडून करण्यात आलेल्या हकालपट्टीनंतर अचानक भारतात त्यांचे खेळाडू सुरक्षित नसल्याचं जाणवलं. बांगलादेशने त्यानंतर सुरक्षेचं कारण देत त्यांचे सामने कोलंबोत खेळवण्यात यावेत, अशी मागणी आयसीसीकडे केली. मात्र आयसीसीने इथेच येऊ खेळावं लागेल, असं ठणकावलं. त्यानंतर बांगलादेशने बंडाचं हत्यार उपसलं आणि सुरक्षेचं थातुरमातूर कारण पुढे करत स्पर्धेवर बहिष्कार घातला. त्यामुळे आयसीसीने अचानक या स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडचा समावेश केला. त्यानंतर आता टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस असणार आहे.
1 मालिका, 3 सामने आणि एकूण 15 खेळाडू, अशी आहे बांगलादेश टीम
वर्ल्ड कप फायनलनंतर पुन्हा एकदा द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिकांचा थरार रंगणार आहे. सुपर 8 फेरीतून बाहेर झालेली पाकिस्तान क्रिकेट टीम वर्ल्ड कप स्पर्धा आटोपल्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. शाहीन आफ्रिदी पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम याला मालिकेतून वगळलं आहे. त्यानंतर आता यजमान बांगलादेशनेही 5 मार्च रोजी या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीटय संघ जाहीर केला आहे. बांगलादेशेने सोशल मीडियाद्वारे पाकिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केल्याची माहिती दिली आहे.
बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी कुणाकडे?
बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मायदेशातील या मालिकेसाठी मेहदी हसन मिराज याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच नजमुल हुसेन शांतो आणि लिटॉन दास या अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच उभयसंघातील तिन्ही एकदिवसीय सामने हे एकाच ठिकाणी ढाका इथे होणार आहेत.
बांगलादेश-पाकिस्तान एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 11 मार्च, ढाका.
दुसरा सामना, 13 मार्च, ढाका.
तिसरा सामना, 15 मार्च, ढाका.
बांगलादेश पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज
Squad Announced for ODI Series Against Pakistan
The Bangladesh Cricket Board has announced the squad for the upcoming ODI series against the Pakistan national cricket team in Dhaka.
The three-match series begins on 11 March, with the remaining matches scheduled for 13 March… pic.twitter.com/AJ5WUcfGG9
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 5, 2026
पाकिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट टीम : मेहदी हसन मिराज (कर्णधार), सौम्या सरकार, सैफ हसन, तंझीद हसन, नजमुल हुसेन शांतो, तॉहीद हृदोय, लिटॉन दास, अफिफ हुसैन, माहिदुल इस्लाम भुईया, रिशाद हुसेन, तन्वीर इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, शरीफुल इस्लाम आणि नाहिद राणा.
Squad Announced for ODI Series Against Pakistan
Leave a Reply