• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Oakley Meta Vanguard: स्मार्टफोनची कामे करेल हा चष्मा, फिचर्स पाहाल तर धक्का बसेल

February 3, 2026 by admin Leave a Comment


Meta आणि Oakley मिळून भारतात नवा Oakley Meta Vanguard स्मार्ट ग्लास लाँच केला आहे. स्मार्ट ग्लास खास करुन एथलीट आणि आऊटडोर युजर्ससाठी तयार केला आहे. हा Ray-Ban Meta ग्लासचा नवा स्पोर्ट्स व्हर्जन मानला जात आहे. यात 12 मेगा पिक्सेल कॅमरा, फुल HD व्हिडियो रेकॉर्डिंग आणि मेटा एआय इंटिग्रेशन मिळतो.युजर या ग्लासने फोटो, व्हिडीओ, कॉल आणि AI असिस्टन्टचा वापर करु शकतो. हिंदी भाषा आणि UPI Lite सपोर्ट सारखा इंडिया-फोकस फिचर जोडण्यात आले आहेत.

किंमत, व्हेरिएंट आणि उपलब्धता

Oakley Meta Vanguard ची सुरुवातीची किंमत 52,300 रुपये ठेवली आहे. हा स्मार्ट ग्लास Sunglass Hut, LensCrafters आणि देशभरातील प्रमुख ऑप्टिकल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. भारतात याची सुरुवाती किंमत 52,300 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यात विविध Prizm लेन्सचे ऑप्शन दिले आहेत.Black आणि White फ्रेमसोबत Prizm 24K, Prizm Black, Prizm Road आणि Prizm Sapphire लेन्स सारखे पर्याय मिळतात. हे प्रोडक्ट प्रीमीयम सेगमेंट युजर्स आणि स्पोर्ट्स लव्हर्सना धान्यात घेऊन तयार केले आहेत.

स्पोर्ट्स डिझाईन आणि मजबूत बिल्ड

Oakley Meta Vanguard ला खास पद्धतीने हाय-इंटेंसिटी आऊटडोर स्पोर्ट्स आणि सायक्लिगंसाठी डिझाईन केले आहे. याचे रॅपअराऊंड डिझाईन डोळ्यांना चांगले कव्हरेज आणि प्रोटेक्शन देते. याचे वजन सुमारे 66 ग्रॅम आहे. त्यामुळे बराच काळ डोळ्यांवर ठेवल्याने त्रास होत नाही. यास IP67 रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच धुळ आणि पाण्यापासून हा ग्लास संपूर्ण सुरक्षित आहे. Prizm लेंस टेक्नोलॉजी ऊन, हवा आणि धुळीचा परिणाम करण्यासाठी देण्यात आली आहे.ज्यामुळे आऊटडोअर व्हिजीबिलीटीसाठी चांगली रहाते.

कॅमरा, ऑडिओ आणि कंट्रोल फिचर्स

या स्मार्ट ग्लासच्या सेंटरला मध्यभागी 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, जो 122 डिग्री फील्ड ऑफ व्यूसोबत फर्स्ट पर्सन व्यू रेकॉर्डिंग करतो. चष्म्याच्या मदतीने युजर 1080p व्हिडियो 30fps वर पाच मिनिटांपर्यंत आणि 60fps वर तीन मिनिटांपर्यंत रेकॉर्डिंग करु शकतो. यात 3K रिझोल्यूशनवर मर्यादित प्रमाणात रेकॉर्डिंग शक्य आहे.ज्यास Facebook आणि Instagram सारख्या Meta एप्सवर शेअर करता येतो. यास ओपन इयर स्पीकर आणि पाच मायक्रोफोनचा सेटअप आहे.यात नवीन एक्शन बटण आणि कस्टम बटण कॅमेरा आणि मोड कंट्रोल सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

Meta AI, हिंदी सपोर्ट आणि बॅटरी

Oakley Meta Vanguard मध्ये Meta AI इंटीग्रेशन दिले आहे.ज्यास Hey Meta AI बोलून अक्टीव्ह केले जाऊ शकते. युजर गाणे ओळखणे, प्रश्न विचारणे, मॅसेज वाचणे आणि मीडिया कंट्रोल सारखी काम वॉईसने करु शकतात.

भारतासाठी हिंदी भाषा सपोर्ट, हिंदी वॉईस इंटरॅक्शन आणि UPI Lite पेमेंट कंट्रोल देखील जोडण्यात आले आहे. AI वॉईस ऑप्शनमध्ये दीपिका पादुकोण हिचा आवाज सामील केला आहे. कनेक्टिविटीसाठी Bluetooth 5.3 आणि Wi-Fi 6E सपोर्ट मिळतो. डिव्हाईसमध्ये 32GB स्टोरेज आहे, बॅटरी लाईफ सामान्य उपयोगात नऊ तास आणि चार्जिंग केससोबत एकूण 36 तास वापरता येते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in