• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NZ vs SA 5th T20i : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना कधी? फायनलला किती वाजता सुरुवात होणार?

March 24, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा विजेता कोण ठरणार? याचा निकाल हा बुधवारी 25 मार्च रोजी लागणार आहे. उभयसंघात आतापर्यंत या मालिकेतील एकूण 4 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. ही मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना जिंकून कोणता संघ मालिका उंचावणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. या निमित्ताने आपण पाचवा टी 20i सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना कधी?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना बुधवारी 25 मार्चला होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i क्रिकेट सामना हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च इथे होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचव्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचव्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 11 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

मालिकेत आतापर्यंत काय झालंय?

न्यूझीलंड मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने यजमान न्यूझीलंडला पराभूत करत विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने जोरदार कमबॅक केलं. न्यूझीलंडने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली. त्यामुळे मालिकेत विजयी सलामी देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची चौथ्या सामन्यात करो या मरो अशी स्थिती झाली. तर न्यूझीलंडला चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने निर्णायक सामन्यात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने यासह मालिकेत बरोबरी केली. त्यामुळे आता पाचव्या आणि अंतिम सामन्यासह कोण मालिका विजेता ठरतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
  • Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in