• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NZ vs SA : वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका पुन्हा आमनेसामने, दोघांपैकी वरचढ कोण?

March 14, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आता हळुहळु द्विपक्षीय मालिकांना सुरुवात होत आहे. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकणारी बांग्लादेश सुपर 8 मधून बाहेर पडलेल्या पाकिस्तान विरुद्ध मायदेशात टी 20i मालिका खेळत आहे. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. या मालिकेचा निकाल हा रविवारी 15 मार्च रोजी तिसऱ्या सामन्यानंतर लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला रविवारपासून आयसीसी मेन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील 2 संघांमध्ये टी 20i मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी 15 मार्चपासून 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा बे ओव्हल, माउंट मौंगानुई इथे होणार आहे. या मालिकेनिमित्ताने दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यापैकी टी 20i क्रिकेटच्या इतिहासात कोण वरचढ राहिला आहे? हे जाणून घेऊयात.

न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकेपैकी सर्वाधिक सामने कुणी जिंकलेत?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ टी 20i क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत एकूण20 वेळा आमनेसामने आले आहेत. या 20 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने मैदान मारलं आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडवर 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत 4 सामने कमी जिंकले आहेत. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला 8 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. मात्र न्यूझीलंड गेल्या काही सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने गेल्या 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत.

एका मालिका आणि 2 कर्णधार

न्यूझीलंड विरूद्धच्या या मालिकेत एडन मार्करम हा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा नियमित टी 20i कर्णधार आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड या मालिकेत 2 कर्णधारांसह उतरणार आहे. न्यूझीलंडचे 2 कर्णधार 2 टप्प्यांत नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहेत.

मिचेल सँटनर न्यूझीलंडचं पहिल्या 3 सामन्यांमध्ये नेतृत्व करणार आहे. त्यानंतर टॉम लॅथम हा शेवटच्या 2 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे 2 कर्णधार मायदेशात होत असलेल्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या संघाला विजयी करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिकडे जग युद्धाच्या चर्चेत गुंतलं अन् इकडे चीनने पाकिस्तानचा लचकाच तोडला, पाकला हादरवणारं असं काय घडलं?
  • MI vs RCB : आधी धोनी आता रोहित-विराट आयपीएलमधून OUT का? इंजरीबद्दल समोर आली महत्वाची अपडेट
  • सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
  • Asha Bhosle last rites LIVE : महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंवर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
  • US-Iran Tension : फक्त काही तास… पुन्हा युद्धाचा भडका, ट्रम्प भयंकर संतापले, जगात हाहाकार उडणार, आता..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in