• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NZ vs SA : रविवारपासून न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका टी 20I मालिका, पहिला सामना कुठे?

March 15, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही क्रिकेट संघ आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता द्विपक्षीय मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा रविवारी 15 मार्च रोजी होणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना झाला होता. न्यूझीलंडने त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. त्यानंतर दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. अशात या मालिकेत कोणता संघ विजयी सलामी देण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघात होणारा पहिला सामना कधी आणि कुठे पाहायला मिळेल? हे जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना कधी?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना रविवारी 15 मार्च रोजी होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना बे ओव्हल, माउंट मौंगानुई इथे होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 11 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना टीव्हीवर लाईव्ह कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहता येईल?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहायला मिळेल.

रविवारी एकाच मैदानात 2 सामने

दरम्यान याच मैदानात रविवारी एकूण 2 सामने होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा दिवसातील दुसरा सामना असणार आहे. त्याआधी याच मैदानात वूमन्स न्यूझीलंड विरुद्ध वूमन्स दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेतील पहिली मॅच खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रविवारी 2  सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब
  • Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं
  • IPL होऊ दे, मग घेऊन जा रे भावा, वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचे पक्का प्रॉमिस; Viral Video पाहून हसू नाही आवरणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in