• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NZ vs SA : न्यूझीलंडची हारकीरी, दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी, किवींवर 7 विकेट्सने विजय

March 15, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपविजेता न्यूझीलंड क्रिकेट टीम मायदेशातील मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला पराभूत करत 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. उभयसंघातील या मालिकेतील पहिल्या सामन्याचं आयोजन हे बे ओव्हलमध्ये करण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेने केशव महाराज याच्या नेतृत्वात न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. सामन्यात नक्की काय झालं? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

सामन्यात काय झालं?

न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार मिचेल सँटनर याने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवण्यात न्यूझीलंडचे फलंदाज अपयशी ठरले. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला घरच्या मैदानात 20 ओव्हरही खेळता आलं नाही. न्यूझीलंडसाठी फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. मात्र त्यानंतरही न्यूझीलंडला 100 धावांपर्यंतही पोहचता आलं नाही.

न्यूझीलंडचं पॅकअप

न्यूझीलंडसाठी जेम्स निशाम याने सर्वाधिक 26 धावांचं योागदान दिलं. कॅप्टन मिचेल सँटनर याने 15 धावा केल्या.तर बेव्हन जेकब याने 10 धावा केल्या. त्या व्यतिरिक्त एकालाही 10 हा आकडाही गाठता आला नाही. न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेसमोर गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेसाठी एकाने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर तिघांनी न्यूझीलंडच्या प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी

नकोबानी मोकोएना याने 3 विकेट्स मिळवल्या. तर गेराल्ड कोएत्झी, ओटनील बार्टमॅन आणि केशव महाराज या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे न्यूझीलंडला 14.3 ओव्हरमध्ये 91 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने हे विजयी आव्हान 20 बॉलआधी 7 विकेट्सआधी पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमने 16.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 93 धावा केल्या आणि सामना जिंकला.

दक्षिण आफ्रिकेची विजयी सुरुवात

🚨 MATCH RESULT 🚨

A complete performance from #TheProteas as they secure a 7-wicket victory to go 1–0 up in the five-match T20I series. 🇿🇦🏏#Unbreakable pic.twitter.com/lhrJR4G7p6

— Proteas Men (@ProteasMenCSA) March 15, 2026

दक्षिण आफ्रिकेसाठी कॉनर एस्टरहुइझेन याने सर्वाधिक धावा केल्या. कॉनरने 48 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 45 रन्स केल्या. तर डियान फॉरेस्टर याने नाबाद 16 धावा केल्या. जेसन स्मिथ याने 10 धावा केल्या. ओपनर टॉनी डी झॉर्जी याने 2 तर रुबिन हरमन याने 7 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंड कायल जेमीसन, झॅकी फॉल्कस आणि मिचेल सँटनर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप; मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब
  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब
  • Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in