• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

News9 Indian Tigers and Tigresses Season 2: धन धना धन गोल, नॅशनल फुटबॉल ट्रायल्सची दणक्यात ओपनिंग, डिब्रूगडमध्ये थरार

March 6, 2026 by admin Leave a Comment

फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी टीव्ही 9 नेटवर्क प्रयत्नशील आहे. भारताची फुटबॉलमधील कामगिरी सुधारावी या हेतूने टीव्ही9 नेटवर्कच्या News9 वतीने इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस या उपक्रमांतर्गत 3 दिवसीय ट्रायलचं आयोजन करण्यात आलं आहे. या ट्रायलच्या पहिल्या दिवसाचं आयोजन हे दिब्रुगडमधील खानिकर स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. दिब्रुगडमधील ट्रायल्सच्या माध्यमातून तळागळात असलेल्या प्रतिभावान युवा फुटबॉलपटूंना हेरणं आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण देणं हे या मोहिमेमागील प्रमुख उद्देश आहे. हा या स्काउटिंग अभियानातील शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यांतर्गत देशातील अनेक राज्यांतून प्रतिभावान फुटबॉलपटूंचा शोध घेतला जात आहे.

या ट्रायल्ससाठी देशातून 38 हजार खेळाडूंनी नोंदणी केली. स्क्रीनिंग आणि फील्ड ट्रायल्सनंतर या 38 हजार खेळाडूंमधून 300 जणांची निवड करण्यात आली. आता आसाममधील दिब्रुगड इथे 3 दिवसांच्या नॅशनल ट्रायल्ससाठी 300 फुटबॉलपटूंची निवड झाली. यातून 25 खेळाडूंची निवड करण्यात येईल. या 25 खेळाडूंना जर्मनीत दिग्गजांकडून फुटबॉलचे धडे दिले जातील. तसेच या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

आसाम सरकारकडून विशेष सहकार्य

आसाम सरकारच्या पाठिंब्यामुळे, क्रीडा प्रशासनाच्या सहकार्यामुळे आणि मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांच्या कार्यालयाच्या सहकाऱ्यामुळे टेस्ट करणं शक्य झालं. या उपक्रमाला आसाम क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा विशेष सचिवांकडूनही पाठिंबा मिळाला.  या टेस्टसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोलाची मदत झाली.

Football Trial

Football Trial

न्यूज9 इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस उपक्रमाने देशात राज्य सरकारसह आणि फुटबॉल संस्थांसोबत भागीदारी देखील स्थापित केलीय. यामध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि लडाख फुटबॉल असोसिएशनच्या फुटबॉल संघटना आणि क्रीडा प्राधिकरणांचा समावेश आहे.

खानीकर स्टेडियमवर झालेल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी हाय स्किल प्रॅक्टीस, मूल्यांकन आणि फिटनेस मूल्यांकन झालं. प्रशिक्षकांनी अंतिम 25 मध्ये निवडण्यात आलेल्या खेळाडूंचं निरीक्षण केलं.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

दिब्रुगडचे जिल्हा आयुक्त बिक्रम कारी, सीआरपीएफचे डीआयजी प्रभाकर त्रिपाठी आणि दिब्रुगडचे जिल्हा क्रीडा अधिकारी सामी सायका यांच्यासह अनेक वरिष्ठ मान्यवर चाचण्यांच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी आयोजक आणि खेळाडूंशी संवाद साधला.

मुख्य प्रशिक्षक कर्मा यांच्यासह अनुभवी प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली या ट्रायल्स होत आहेत. कर्मा यांनी निवड प्रक्रियेचे स्पर्धात्मक स्वरूप, तांत्रिक कौशल्ये आणि मानसिकरित्या कणखर असलेले खेळाडू ओळखण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केलं.

Assam Government Football Trial

Assam Government Football Trial

न्यूज9 च्या या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस उपक्रमाला रमैया विद्यापीठ सहयोगी प्रायोजक म्हणून सहकार्य लाभलं आहे. रमैया विद्यापीठाच्या या योगदानामुळे भावी फुटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्याचा मार्ग तयार होत आहे.

अटीतटीची स्पर्धा, खेळाडूंचा उत्साह आणि मजबूत संस्थात्मक पाठिंब्यासह दिब्रुगडमधील नॅशनल ट्रायलसाठी मंच तयार आहे. आता उर्वरित 2 दिवस ट्रायल होणार आहे. जर्मनीत आपल्या फुटबॉलचं प्रशिक्षण घेता यावं यासाठी आता काही खेळाडूंमध्ये चुरस आहे.

पहिल्या मोसमाचं यशस्वी आयोजन

नवी दिल्लीत ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे 2025’ ग्लोबल समिटचं आयोजन करण्यात आलं होतं. या समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटबॉल टॅलेंट सर्च प्रोग्रामच्या पहिल्या मोसामासाठी निवड करण्यात आलेल्या देशातील सर्वोत्तम युवा फुटबॉलपटूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. भारतातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 द्वारे या ग्लोबल समिटचं आयोजन करण्यात आलं होतं. हे आयोजन मार्च 2025 मध्ये दिल्लीतील भारत मंडपम येथे करण्यात आलं होतं. तेव्हा युरोपमधील यशस्वी दौऱ्यानंतर तरुण फुटबॉलपटूंचे ऑस्ट्रियाई दूतावासात माननीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि भारतातील ऑस्ट्रियन राजदूत कॅथरीना विझर यांनी स्वागत केले होतं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in