• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

News9 Indian Tigers and Tigresses Season 2: आसाममध्ये 3 दिवसीय सराव शिबिराची यशस्वी सांगता, 25 खेळाडूंचं नशिब पालटणार

March 9, 2026 by admin Leave a Comment

आसाममधील दिब्रूगढ येथील खानिकर स्टेडियममध्ये टीव्ही9 नेटवर्कच्या वतीने फॅटबॉल टँलेट हंट प्रोग्राम ‘न्यूज 9 इंडियन टायगर्स एन्ड टायग्रेसच्या दुसऱ्या पर्वातील 3 दिवसीय सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या 3 दिवसीय सराव शिबिराची यशस्वी सांगता झाला आहे. या शिबिरातील तिसरा आणि अंतिम दिवस निर्णायक ठरला. शिबिराच्या तिसऱ्या दिवसी सहभागी खेळाडूंचा चांगला कस लागला. शिबीरातील पहिले 2 दिवस या युवा खेळाडूंना तांत्रिकरित्या फुटबॉलबाबत अधिकाअधिक माहिती देण्यात आली. तर तिसऱ्या आणि अंतिम दिवशी सामने खेळवण्यात आले.

राष्ट्रीय सराव शिबिराचं उद्देश काय?

देशभरातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना फुटबॉलबाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिग्गजांकडून योग्य मार्गदर्शन देणं, हा न्यूज 9 इंडियन टायगर्स एन्ड टायग्रेसच्या या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. या प्रतिभावान खेळाडूंचा शोधणं घेणं सोप जावं यासाठी 3 दिवसीय सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. देशातून जवळपास 38 हजारापेक्षा अधिक खेळाडूंनी या सराव शिबिरात सहभाग घेतला होता. त्यातून 14 आणि 17 वर्षांखालील एकूण 300 मुलं आणि मुलींची निवड करण्यात आली. या खेळाडूंना नॅशनल ट्रायलसाठी दिब्रुगडमध्ये बोलावण्यात आलं होतं.

तिसऱ्या दिवशी काय झालं?

सराव शिबिराच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी पूर्ण क्षमतेने सामने खेळवण्यात आले. सराव शिबिरात युवा खेळाडू दबावाचा सामना कसा करतात? निर्णय कसे घेतात? परिस्थिती कशी हाताळतात? तसेच कामगिरी कशी करतात? याकडे अधिक लक्ष देण्यात आलं. यासाठी मैदानात सामन्यादरम्यान प्रशिक्षक आणि निवड समितीचे सदस्य उपस्थित होते. तसेच आपल्या मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता.

25 खेळाडूंचं नशिब पालटणार

न्यूज 9 च्या ‘इंडियन टायगर्स एन्ड टायग्रेसच्या या विशेष मोहिमेअंतर्गत प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिलं जातं. आता 3 दिवसीय शिबिरांतर सर्वोत्तम 25 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. या 25 खेळाडूंना निवडीनंतर प्रशिक्षणासाठी जर्मनीला पाठवण्यात येणार आहे. जर्मनीत या 25 खेळाडूंना फुटबॉलबाबत दिग्गजांकडून बारकावे जाणून घेता येतील. तसेच तज्ज्ञांकडून फुटबॉलचे धडे मिळतील, जे या भावी खेळाडूंना भविष्यात निश्चित मदतशीर ठरतील.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in