• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Netflix ने लहान मुलांसाठी विनाशुल्क आनंद घेण्यासाठी ‘Playground app’केले लाँच, याबद्दल जाणून घ्या सविस्तर

April 8, 2026 by admin Leave a Comment


ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने Netflix Playground’ नावाचे एक खास गेमिंग ॲप लाँच केले आहे, जे पूर्णपणे सुरक्षित आणि जाहिरातमुक्त आहे. हे ॲप विशेषतः 8 वर्षांखालील मुलांसाठी तयार करण्यात आले आहे. या ॲप-मधील वापरकर्त्यांना खरेदी किंवा अतिरिक्त शुल्काचा कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीये. ही पालकांसाठी दिलासादायक बाब आहे, कारण आता ते कोणत्याही काळजीशिवाय आपल्या मुलांना गेम खेळायला देऊ शकतात. मुलांसाठी हे एक सुरक्षित आणि मनोरंजक व्यासपीठ बनवणे, हे कंपनीचे ध्येय आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या ॲपबद्दल अधिक जाणून घेऊयात.

लहान मुलांसाठी सुरक्षित आणि जाहिरातमुक्त गेमिंग प्लॅटफॉर्म

नेटफ्लिक्स प्लेग्राउंड हे खास लहान मुलांसाठी तयार केले आहे, जे पूर्णपणे जाहिरातमुक्त अनुभव देते. या ॲपमध्ये कोणतेही इन-ॲप खरेदी किंवा इतर शुल्क नाहीत, त्यामुळे पालकांना अतिरिक्त खर्चाची चिंता करण्याची गरज नाही. हे ॲप तुमच्या सध्याच्या नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसोबत काम करते, म्हणजेच वेगळे काहीही खरेदी करण्याची आवश्यकता नाही. कंपनीच्या मते हे ॲप मुलांची सर्जनशीलता आणि शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी तयार केले आहे. तसेच ॲप त्यांच्या आवडत्या पात्रांसोबत एक मजेदार आणि सुरक्षित गेमिंग अनुभव देते, ज्यामुळे स्क्रीन टाइम उपयोगी बनतो.

लोकप्रिय पात्रांसह मजेदार खेळ आणि ऑफलाइन सपोर्ट

या ॲपमध्ये मुलांसाठी अनेक प्रकारच्या सोप्या आणि इंटरॅक्टिव्ह गेम दिले आहेत. जे त्यांच्या आवडत्या कॅरटून शोच्या आवडत्या कॅरेक्टरवर आधारित करून दिले आहेत. यामध्ये Peppa Pig, Sesame Street आणि Dr. Seuss यांच्यासारख्या आधारित गोष्टींवर गेम या ॲपमध्ये देण्यात आले आहेत. खेळांमध्ये पजल्स, मेमरी गेम्स, रंग भरण्याची पाने आणि इतर‍ क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीचा समावेश आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व गेम बिना इंटरनेट कनेक्शनशिवाय खेळता येतात. याचा अर्थ मुले प्रवासात किंवा कमकुवत नेटवर्कवरही सहजपणे गेम खेळू शकतात.

अ‍ॅप कसे डाउनलोड करावे आणि वापरावे
नेटफ्लिक्स प्लेग्राउंड ॲप डाउनलोड करा, आणि हे वापरणे देखील खूप सोपे आहे. वापरकर्ते ॲपल ॲप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून ते त्यांच्या फोन किंवा टॅबलेटवर शोधून इन्स्टॉल करू शकतात. त्यानंतर ॲप उघडून त्यांच्या नेटफ्लिक्स खात्याद्वारे लॉग इन करा. एकदा लॉग इन झाल्यावर, एक साधा मुलांसाठी अनुकूल असा इंटरफेस दिसतो, जिथे गेम्सच्या रेंजनुसार प्रदर्शित केले जातात. पालकांसाठीही मूलभूत नियंत्रणे उपलब्ध आहेत, ज्यामुळे ते गरजेनुसार स्टोरेज व्यवस्थापित करू शकतात आणि गेम्स काढून टाकू शकतात.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चाणाक्य सांगतात, ‘या’ गोष्टी करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल
  • तुमच्या आवडीचे आईस्क्रीम सांगेल तुमचा स्वभाव, चॉकलेट फ्लेवर आवडणारे लोक तर…
  • उधार घेतलेले पैसे परत केले नाही तर काय होते? महाराज म्हणतात…
  • धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदी संधी दिली तर… करुणा मुंडेंचा तो शाप महायुतील सरकारला भोवणार?
  • बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in