• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Navi Mumbai Crime : नवीमुंबईत रस्त्यावर ड्रग्स तस्करांचा हैदोस, पोलिसांवर तलवार आणि गावठी कट्ट्याने हल्ला

February 3, 2026 by admin Leave a Comment


नवीमुंबईतील उलवे परिसरात ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी तलवार आणि देशी कट्ट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी बाईकने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. ३१ जानेवारी रोजीच्या रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आरोपींवर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवरच आरोपींना जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आह. हा प्रकार नवीमुंबईतील उलवे येते ३१ जानेवारीच्या रात्री ११.५० वाजता घडला आहे. ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांचे दहा जणांचे पथक नवीमुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

बई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार इस्माईल शेख आणि शाहिद खान त्यांच्या १० ते १५ साथीदारांसह बाईकवरुन या भागात फिरत होते. पोलिसांच्या गुप्त बातमीदारांनी ही खबर पोलिसांना दिली.एपीआय किरण मांढरे यांच्या पथकाने येथे जाऊन कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मांढरे यांनी सर्व सहकाऱ्यांना गाडीतून उतरुन या सर्वांना पकडण्याचे आदेश दिले.

पोलिसांना आपल्या दिशेने येताना पाहून आरोपींनी अचानक हल्ला केला. आरोपींकडे तलवार, देशी कट्टे, हॉकी आणि अन्य घातक हत्यारे होती. एका खबऱ्याच्या डोक्यावर तलवारी वार करण्यात आले. तर दुसऱ्या एका खबऱ्याच्या छातीवर बंदूक ठेवून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या झटापटी एपीआय किरण मांढरे यांनी एका आरोपीला पकडून ठेवले त्यावेळी त्यांच्या अंगावर बाईक घालण्याचा प्रयत्न केला गेला.तसेच अन्य पोलिसांवर देखील तलवारी हल्ला करण्याचा केला गेला. परंतू सुदैवाने कोणाला गंभीर जखमा झाल्या नाहीत.

या संपूर्ण झटापटीचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात स्पष्ट दिसत आहे की ड्रग्स तस्कर खुलेआम रस्त्यांवर हत्यारे घेऊन फिरत आहेत.या घटनेमुळे नवीमुंबई पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नवी मुंबई पोलिसांना गुन्हेगारांना धाक नसल्याचे उघडकीस आले आहे.पोलिसांनी इस्माईल शेख, शाहिद खान, अयाझ खान, आसिफ खान, मेराज खान, निझाम, शोएब, मेहराज आणि अन्य आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in