• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nashik Crime : वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?

April 10, 2026 by admin Leave a Comment


नाशिक शहरातील एका नामांकित आयटी (IT) कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण तसेच त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या तरूणींना चांगल्या करिअरचं स्वप्न दाखवत, त्यांच्याशी अश्लील वर्तन करण्यात आलं, त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं, एवढंच नव्हे तर त्यांचे धर्मांतर करून विशिष्ट धर्माची संस्कृति लादण्याचा प्रयत्न केल्याचंही उघडकीस आलं होतं. त्या मुलींच्या कुटुंबियांसह अख्खं राज्य हादरलं. याप्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांन गोपनीय कारवाई देखील करण्यास सुरूवात केली. त्याअंतर्गतच एक धाडसी मोहीम राबवण्यात आली आणि संपूर्ण सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.
वेषांतर करून गेल्या आणि…
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिला अधिकाऱ्यांनी वेषांतर केलं आणि त्या या कंपनीत दाखल झाल्या. या ऑपरेशनसाठी एकूण 7 महिला पोलिसांची स्पेशल टीम तैनात करण्यात आली होती. कंपनीत गेल्यावर त्या महिला पोलिसांनी मीटिंगदरम्यान, आरोपी हे अश्लील हावभाव करताना तसेच गैरवर्तन करताना दिसले. स्वत:च्या डोळ्यांनी हा प्रकार पाहिल्यावर महिला अधिकाऱ्यांनी  हे सगळं हेरलं आणि त्यांनी तातडीने, शिताफीने कारवाई करत या आरोपींना बेड्या ठोकल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणात 40 हून  अधिक CCTV फुटेजची तपासणी करण्यात आली तसेच ठोस पुरावे जमा करण्यात आले. डिजिटल आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे मोठी कारवाई यशस्वी झाली. नाशिक पोलिसांच्या धाडसी आणि अचूक ऑपरेशनमुळे या भयानाक प्रकरणाचा अखेर भांडाफोड झाला आहे.
अश्लील चाळे, गैरवर्तन आणि अटक 
नाशिकमध्ये घडलेल्या या आयटी जिहाद प्रकरणाची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यावर पोलिसांनी एक ऑपरेशन राहवत आरोपींचा पर्दाफाश करण्याची योजना आखली. त्याअंतर्गंत नाशिक पोलिसांनी 7 वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची टीम तयार केली. या कंपनीते असे अश्लील प्रकार, धर्मांतर सुरू असल्याची तक्रार काही महिलांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन दिली होती. मात्र हे समोर आल्यावर, यासंबंधी थेट तिथे जाऊन कारवाई न करता पोलिसांन 7 महिला अधिकाऱ्यांची टीम तयार केली.
सॉफ्टवेअर कंपनीत आपलं काम असल्यांच सांगून या महिला अधिकारी तिथे, त्या कंपनीत गेल्या. आणि  कंपनीतल कर्मचारी हे महिलांशी लगट करता, त्यांच्याशी अश्लील चाळे करतात, हे तिथे गेल्यानंतर वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या महिला अधिकाऱ्यांनी तातडीने या लोकांना ताब्यात घेतलं.आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला आमच्यासोबत याव लागेल असं सांगत महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्या लोकांना बेड्या ठोकल्या. अत्यंत गुप्तपुणे नाशिक पोलिसांनी ही कारवाई करत ऑपरेशन राबवलं. यानंतर 9 महिलांनी पुढे येऊन गुन्हा दाखल केला.
याप्रकरणाच्या तपासादरम्यान उघडकीस आलेल्या माहितीनुसार, कंपनीतील काही टीम लीडर्स तरुणींचा पद्धतशीर ‘ब्रेनवॉश’ करत होते. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष दाखवले जात होते. दोन विवाहित महिलांसह आठ तरुणींच्या लैंगिक शोषण आणि विनयभंगाचे एकूण 9 गुन्हे दाखल झाले आहेत. केवळ महिलांनाच नव्हे, तर एका तरुणालाही बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
6 आरोपींना अटक, महिला एचआरचाही समावेश
याप्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत 6 आरोपींना अचक केली असून त्यामध्ये एका महिला एचआरचाही समावेश आहे.  अनेक दिवसांपासून फरार असलेल्या, खाजगी कंपनीच्या एचआरला नाशिक पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. महिलांनी वारंवार कंपनीच्या एचआरकडे तक्रार करूनही तिने दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी तिला सहआरोपी  केलं आहे.  यामुळे या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे, आज या सर्व आरोपींना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 3 मिनिटांचं गाणं, जे लोक आजही पुन्हा-पुन्हा ऐकतात, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या बोल्ड ड्रेसमुळे झाला होता मोठा वाद
  • पत्नीचं गावातच झंगाट, प्रियकराच्या मदतीने पतीचा गेम केला, अचानक 12 दिवसांनी…. सांगलीत काय घडलं?
  • फक्त कमवू नका, सुरक्षितही करा, 30 च्या वयात इस्टेट प्लॅनिंग का गरजेचं? जाणून घ्या
  • एका माणसाचे 4 मृतदेह.. डोकं चक्रावून टाकणारा सस्पेन्स; 8 एपिसोड्सची ही सीरिज OTT वर होतेय तुफान ट्रेंड
  • Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहि‍णींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in