• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nashik Crime : मीटिंगमध्ये पायाने स्पर्श, लॉबीत शरीराशी झटापट आणि.. नाशिकच्या कंपनीत घडणारं वाचून लाजेनं जाईल मान खाली !

April 12, 2026 by admin Leave a Comment


नाशिक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, भोंदू खरात आणि नराधम पत्रकार रवींद्र एरंडे केसनंतर सध्या नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामुळे अख्खं राज्य हादरलं आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील नामांकित आयटी (IT) कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण तसेच त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचं उघडकीस आलं होतं, तसेच एका तरूणावरही धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचं उघड झालं होतं. अत्यंत हादरवणाऱ्या अशा या घटनेतील एकेक कृत्यांचा आता पर्दाफाश होत आहे. मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या तरूणींना चांगल्या करिअरचं स्वप्न दाखवत, त्यांच्याशी अश्लील वर्तन करण्यात आलं, त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं, एवढंच नव्हे तर त्यांचे धर्मांतर करून विशिष्ट धर्माची संस्कृति लादण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.

याप्रकरणाचा तपास सुरू असून कंपनीतील आरोपी हे फक्त पुरूष नव्हे तर त्यात महिलांचाही समावेश होता, ते Whatsapp ग्रुप बनवून पुढचं टार्गेट ठरवायचे ही माहिती नुकीतच उघड झाली होती. आता याचसंदर्भात एक हादरवणारी अपडेट समोर आली आहे. या नामांकित कंपनीतील हिंदू मुलींशी प्रेमाचं नाटक केलं जायचं, त्यांना वेगेवगळी आमिष दाखवली जायची आणि त्यांच्यासोबतक अश्लील कृत्य सुरू होतं. आरोपींची मोडस ऑपरेडी कशी होती हेही समोर आलं आहे..

पायाने स्पर्श आणि नंतर लॉबीमध्ये शरीराशी झटापट

कंपनीत काम करणाऱ्या तरूणी व महिला यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात यायचे, त्यांचा विनयभंग केला गेला आणि धर्मांतराचाही दबाव टाकण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, या नामांकित कंपनीत एक हिंदू मुलगी काम करायची, तिच्या शरीराला स्पर्श करत, तिला प्रेमात अकवण्याचा प्रयत्न केला जात होता. तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करून वेगवेगळी आमिष दाखवली जायची, तसेच तर अश्लील कृत्यही सुरू होती. एवढंच नव्हे तर तिच्याशी अश्लील कृत्य करताना फोटो व्हिडिओ काढले जायचे, ते व्हायरल करू, कुटुंबियांना दाखवू, अशी भीती घालत त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न केला जात होता असा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. ऑफीसमध्ये मीटिंग असेल तेव्हा, तसेच कामाची वेळ असेल तेव्हा तरूणीवा पायाने स्पर्श केला जायचा, सगळ्यात भयानक म्हणजे, नंतर लॉबीत तिला गाठून तिच्या शरीराशी झटापट करून विनयभंगही केला जात होता अशी हादरवणारीह माहितीही तपासात समोर आली आहे.

हिंदू देव-देवतांचा अपमान, विकृत अर्थ, अश्लील शेरेबाजी

हा प्रकार इथेच थांबला नाही, तर कंपीनीतल हे नराधम आरोपी केवळ शरीरावर नाही तर, श्रद्धेवरही घाव घालत होते. ते हिंदू देव-देवतांचा अपमान करून, पौराणिक ग्रंथांचा विकृत अर्थ लावून, अश्लील शेरीबाजी करत असल्याची माहिती देखील पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. कंपनीत नोकरी करणाऱ्या अनेक मुली आणि महिलांसोबत हा बयानक प्रकार घडत होता, मात्र हे आपल्या एकटीसोबतच असल्याचं त्यांना वाटत होतं, भीतीपायी त्या तोंड उघडत नव्हत्या, कुठे चर्चा करत नव्हत्या, मात्र हे सर्व फक्त हिंदू मुलींसोबतच घडत असल्याचं कालांतराने उघड झालं. या प्रकरणात पोलिसांकडून कंपनीच्या टीम लीडरसह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक महिला अद्याप फरार आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Devendra Fadnavis: राहुल गांधींची लढाई ही केवळ…मुख्यमंत्र्यांच्या टीकेने काँग्रेसचा तीळपापड? काय केली टीका?
  • 4 मिनिट 31 सेकंदाचे सुपरहिट गाणे, ऐकताच होईल जुन्या प्रेमाची आठवण, 20 मिनिट केले रेकॉर्ड
  • ‘गोंधळ’चा दिग्दर्शक बनला सर्पमित्र; Video पाहून नेटकरी म्हणाले ‘रिअल लाइफ हिरो’
  • अशोक खरातप्रकरणी अनेक बळी जाणार, देवेंद्र फडणवीसांना… संजय राऊतांनी फोडला मोठा बॉम्ब
  • Iran-Us : फालतू मागण्या… इराणने अमेरिकेचा कचराच केला ! चर्चा फिस्कटल्याचं खापर फोडत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in