
नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये एबी फॉर्म न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील टीव्ही सेट आणि काचा फोडल्याची घटना घडली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांच्या नाराज कार्यकर्त्याने नागपूर कार्यालयातील टीव्ही संच फोडला तर ठाकरे गटाच्या नाराज कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची पोस्टर्स फाडल्याची घटना पुण्यात घडली आहे.
या प्रभागात पैसे घेऊन तिकीट विकण्यात आले आहेत.हे लोक खंडणी सुद्धा मागतात अशा प्रकारचा आरोप तोडफोड करणारा कार्यकर्ता अविनाश पारडीकर यांनी केला आहे.
या प्रकरणात कार्यकर्त्यांनी नाराज होत हा प्रकार केला आहे. कारण आमच्याकडे उमेदवारांची संख्या जास्त असल्याने त्यांना तिकीट मिळाले नाही असे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने काही इच्छुकांना तिकीट न मिळाल्यामुळे हा प्रकार घडला असून त्या कार्यकर्त्यांनी माफी देखील मागितली असल्याचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी म्हटले आहे.अहिरकर यांशी संवाद साधला टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधी सुनील ढगे यांनी.




Leave a Reply