• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Marathon: मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह; आमिर खानने सहकुटुंब घेतला भाग

January 18, 2026 by admin Leave a Comment


आज (रविवार, 18 जानेवारी) मुंबई मॅरेथॉनमध्ये 65 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला आहे. या गोल्ड लेबल इंटरनॅशनल शर्यतीची एकूण बक्षीस रक्कम जवळपास 3.54 कोटी रुपये आहे. 42 आणि 21 किलोमीटरच्या या शर्यतीत सहभागी होणाऱ्या धावपटूंना कोस्टल रोडवर धावण्याची संधी मिळाली आहे. मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात पहिल्यांदाच कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसह या मॅरेथॉनमध्ये काही सेलिब्रिटींनीही भाग घेतला आहे. सकाळी 5 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनला सुरुवात झाली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून या ड्रीम रनला फ्लॅग दाखवण्यात आला. मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रनमध्ये अभिनेता आमिर खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाला.

“आज मी सहकुटुंब मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो आहे आणि मला खूप चांगलं वाटत आहे. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि व्यायाम करावा,” असं आवाहन त्याने चाहत्यांना केलं. यावेळी पाणी फाऊंडेशनचं काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचंही त्याने सांगितलं. मुंबई महानगरपालिकेच्या निकालाविषयी प्रश्न विचारला असला निकाल काय लागला हे मी पाहिलं नाही, ते तुम्हाला माहीत आहे, असं तो पत्रकारांना म्हणाला.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीसुद्धा या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. ओमर अब्दुला यांनी माहीम इथून यात सहभाग घेतला. याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “मी बऱ्याच काळापासून मुंबई मॅरेथॉनबद्दल ऐकत आहे. मी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेत आहे. तरुणांनी आरोग्याला प्राधान्य द्यावं आणि स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवणं टाळावं. आपण दररोज खेळ आणि व्यायामात भाग घेतला पाहिजे. आमच्यासारखे लोक मुंबईत येतात तेव्हा इथे आधीपेक्षा खूप फरक पाहतात. मी मुंबईत होतो. मी इथे तीन वर्षे राहिलो. त्यावेळी कोस्टल रोडसारखी पायाभूत सुविधा बांधली जाईल अशी आम्हाला कल्पनाही नव्हती. पण ती बांधली गेली आणि जर मुंबईसाठी अशा आणखी गोष्टी बांधल्या गेल्या तर त्याचा फायदा रहिवाशांना होईल.”

महापालिकेच्या निकालांविषयी ते पुढे म्हणाले, “निवडणुका बऱ्याच काळानंतर झाल्या आहेत आणि प्रत्येक निवडणुकीत कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो. ज्यांनी यश मिळवलं आहे आणि जास्तीत जास्त जागा मिळवल्या आहेत ते भाजपचे आहेत. मुंबई शहरातील रहिवाशांच्या आशा पूर्ण करणं ही त्यांची जबाबदारी आहे.”

पहिली मॅरेथॉन

हौशी मॅरेथॉन (42.995 किमी)
05.00 वाजता सीएसएमटी इथून सुरू

दुसरी मॅरेथॉन

10 किमी
06.00 वाजता सीएसएमटी येथून सुरू

तीसरी मॅरेथॉन

एलिट मॅरेथॉन (42.995 किमी)
07.00 वाजता सीएसएमटी इथून सुरू

चौथी मॅरेथॉन

दिव्यांग मॅरेथॉन
१.६ किमी
०७:०५ वा. सीएसएमटी येथून सुरू झाली.

पाचवी मॅरेथॉन

जेष्ठ नागरिक मॅरेथॉन
४.२ किमी
०७:२५ वा. सीएसएमटी येथून सुरू झाली.

सहावी मॅरेथॉन

ड्रीम रन
५.९ किमी
०८:१५ वा.सीएसएमटी येथून सुरू होईल .



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इतकं धाडस की भरदिवसा तरुणाने प्रेयसीचा गळा चिरला, क्षणात तरुणीचा मृत्यू; महाराष्ट्र हादरला
  • GT vs DC: आयपीएल स्पर्धेत गुजरातचा अवघ्या एका धावेने विजय, विक्रमासह असा जुळून आला योग
  • Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी
  • अभिनेत्रीचा 14 वर्षांचा संसार मोडला; पतीचे 2-4 नाही तर 9 महिलांसोबत अनैतिक संबंध उघड
  • US, Israel Ceasefire : अमेरिकेनं पाकिस्तानला वेड्यात काढलं, ट्रम्प यांच्याकडून शरीफ, मुनीर यांचा मोठा गेम, रिपोर्टने मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in